Police Bharti update 2022: पोलीस भरती नियमात मोठा बदल! आता मैदानी चाचणी होणार पहिल्यांदा! ‘या’ तारखेला होणार ७२३१ पदांची भरती..

0

Police Bharti update 2022: ग्रामीण भागातील मुलांना पोलिस भरतीत (police Bharti) प्राधान्य मिळावे, यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांनी नियमात बदल करून पहिल्यांदा लेखी ऐवजी मैदानी चाचणी घेतल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आर-आर पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो मुलं पोलीस होऊ शकली. त्या काळात भरती झालेली अनेक मुलं आर आर पाटलांना देव देखील मानतात. एवढंच, नाही तर अनेकांचा देवघरात स्वर्गीय आर आर पाटलांचा फोटो देखील असल्याचं पाहायला मिळतं. मात्र 2014 ला भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, या नियमात पुन्हा बदल करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पोलीस भरती नियमात बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना हा अन्यायकारक निर्णय वाटला. ग्रामीण भागातील अनेक मुले आपल्या शेतातलं काम करत करत पोलीस भरतीची तयारी करत असतात. घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे अनेकांना उच्च शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक जण बारावीनंतर घरचांना शेतातल्या कामात हातभार लावतात. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच तरुणांना अशाच प्रकारे घरच्यांना मदत करत करत पोलीस भरती करावी लागते.

सहाजिकच घरच्यांना मदत करत पोलीस भरती करत असल्याने अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र तरुणांचे लेखी ऐवजी मैदानी चाचणी प्रचंड दर्जेदार असते. मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी खेडेगावात पोषक वातावरण असते. त्याचबरोबर बहुतांश हे तरूण शेतकऱ्याची पोरं असल्याने, या मुलांना अनेकदा ताज्या भाज्या देखील खायला मिळतात. सहाजिकच त्यामुळे या मुलांची मैदानी चाचणी उत्तम असते. आणि म्हणून पहिल्यांदा मैदानी चाचणी हा या मुलांसाठी मोठा आशेचा किरण होता.

परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय बदलत पहिल्यांदा लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने पुन्हा मैदानी चाचणी पहिल्यांदा होणार असल्याचे जाहीर केल्याने, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हा मोठा आशेचा किरण आहे. गृहमंत्रालयाकडून जुलै-ऑगस्टमध्ये केली जाणारी 7231 पदांची भरती आता पहिल्यांदा मैदानी चाचणी घेऊनच पार पडणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून, महाराष्ट्र लोकशाहीला मिळाली आहे.

महाराष्ट्र गृह विभागात पाठीमागच्या दोन वर्षांपासून कोणतीही नवीन पोलीस भरती झालेली नाही. 2019 मध्ये घोषित करण्यात आलेली पाच हजारांची भरती तब्बल दीड वर्ष गेली. मात्र या भरतीत अनेक घोटाळे देखील उघडकीस आले. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरतीला 2022 उलटलं, तरी देखील मुहूर्त सापडला नव्हता. मात्र आता भरती संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढच्या महिन्यापासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भरती प्रक्रियेच्या नियमात बदल

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील तरुणांना महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आर आर पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती होऊन अंमलबजावणी होईल, अशी आशा होती. तसं पाहायला गेलं तर गृह विभागाकडून 2019 मध्ये पोलीस भरती प्रक्रिये संदर्भात पहिल्यांदा मैदानी चाचणी व्हावी, याबाबत चर्चा झाली होती. मात्र आता मैदानी चाचणी होऊनच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. यामध्ये पहिल्यांदा गोळाफेक, लांबउडी, पुलअप्स त्याचबरोबर १०० मीटर धावणे, असं या मैदानी चाचणीचे स्वरूप असणार आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी येणारा काळ आहे सुवर्ण

महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागातील रिक्त पदांचा विचार करायचा झाला तर, ही रिक्त पदे तब्बल 49 हजार 500 रिक्त जागा आहेत. 49,500 जागांपैकी पहिल्या टप्प्यातील भरती जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार 231 पदांची पार पडणार आहे. त्याचबरोबर उर्वरित रिक्त पदांची भरती देखील एकत्रितपणे केली जाणार असल्याची माहिती आहे. सहाजिकच त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना येणाऱ्या काही वर्षात पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे तरुणांनी मैदानी सरावाबरोबरच लेखी सराव देखील सुरू ठेवणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Second hand bullet: दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता या सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

hair fall solution: या पद्धतीने कांद्याचा करा वापर, आणि केस गळतीपासून मिळवा कायमचा आराम..

INDvSA: अरे देवा! सामन्यावर पाऊसाचे सावट, मालिका विजयासाठी ऋषभ पंत अँड कंपनी उत्सुक.‌.

Male Infertility: मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

Men Health Tips: शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.