hair fall solution: ‘या’ पद्धतीने कांद्याचा करा वापर, आणि केस गळतीपासून मिळवा कायमचा आराम..

0

hair fall solution: आजकाल बदलत चाललेले हवामान, वाढत चाललेले प्रदूषण, या सर्वांचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो. यामुळे बऱ्याचदा तुमचे केस गळू शकतात, केस तुटू लागतात, केसांची मुळे कमकुवत होतात. केस निर्जीव दिसू लागतात. त्याचसोबत आजकाल बऱ्याच लोकांच्या केसात कोंडा होण्याची समस्या आहे. बरेच लोक केसांच्या समस्यांमधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या विविध केमिकल निर्मित उत्पादनांचा वापर करत असतात. बरेच लोक केसांच्या समस्येमुळे त्रस्त देखील असल्याचे पाहायला मिळतात. कारण केस आपल्या सौदर्याचा खूप महत्वाचा घटक आहे.Hair Problems: डोक्यातील पांढरे केस तोडल्यानंतर केस आणखी पांढरे का होतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण..

आयुर्वेदात केसाच्या प्रत्येक समस्येवर बरेच उपचार आहेत. परंतु बऱ्याच लोकांना त्यासाठी तेवढा वेळ नाही. बऱ्याच लोकांना झटपट सर्व गोष्टी हव्या असतात, आणि मग हे लोक रासायनिक कंपन्यांनी बनवलेल्या उत्पादनाकडे वळतात. या कंपन्या देखील मग याच गोष्टीचे भांडवल करतात. केसांचे उत्पादन असेल, तर मग आमच्या उत्पादनामध्ये आम्ही कोरफड वापरतो, तसेच कांदा वापरतो, अशी जाहिरातबाजी करत असतात. त्याच्या खोलात जर आपण गेलो, तर तुमच्या देखील लक्षात येईल, खरंच या कंपन्या हे कोरफड वगैरे वापरत असतील का? तुम्हाला घरगुती कांदा वापरून देखील तुमच्या केसांच्या सर्व समस्या सोडवता येतील. चला सविस्तर जाऊन घेऊ. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

कांदा केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये असलेले घटक केसांची मुळे घट्ट व कणखर होण्यात मदत होते. कांद्याच्या रस टाळूला लावल्याने तुमच्या केसांची मुळे मजबूत होतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, बाजारात मिळणारी केमिकल उत्पादने वापरल्याने तुमच्या केसांवर त्याचा दुष्परिणाम देखील होऊ शकतो. त्या तुलनेत घरगुती आणि नैसर्गिक उपचार घेतलेले कधीही योग्यच ठरेल. एवढेच नाही तर स्त्रियांच्या केसांची वाढ करण्यासाठी देखील कांदा खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस केसांना लावल्याने एन्झाइम नावाचे अँटिऑक्सिडंट वाढते. त्यामुळे केस वाढीस मदत होते.

कांद्याचा रस वापरण्याची पद्धत

सर्वप्रथम कांदा बारीक करून किंवा किसून कांद्याचा रस काढा किंवा मिक्सरचा देखील तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर कांद्याच्या रसात कापसाचे पॅड बुडवा. तुमचे केस वेगवेगळे म्हणजे सुटसुटीत करा. जेणेकरून कांद्याचा रस तुमच्या मुळापर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठी तुमचे केस सुटसुटीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही कांद्याच्या रसात बुडवलेले कॉटन पॅड तुमच्या केसांना लावा किंवा तुम्ही कापसाचा वापर करून किंवा हाताने देखील कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावू शकाता. त्यानंतर काही वेळानंतर तुमचे केस शाम्पू किंवा कंडीशनरचा वापर करून केस धुवू शकता. केस धुतल्यानंतर केसांना पुसून घ्या. त्यानंतर केसांना कांद्याचा वास जाण्यासाठी थोडेसे तेल लावा.

यासोबत कांद्याचा रस लावल्यास आणखी फायदा

कांद्याचा रस, कोरफड, सोबतच खोबरेल तेल, एकत्रित करून घ्या. हे तेल तुम्ही नियमित केसांना लावू शकता. त्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य चांगले राहील. केस सुंदर दिसतील व मजबूत देखील होतील.आपल्या केसांचे आरोग्य बिघडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे कोंडा. कोंडा आपल्या केसांना कमकुवत करत असतो. कोंड्याची समस्या बऱ्याच लोकांना सतावत आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना पुरेसा कांद्याचा रस घ्या. त्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे मध टाका. आता हे मिश्रण तुमच्या केसांना लावा. आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण तुमच्या केसांना लावल्यास तुमच्या केसातील कोंडा नाहीसा होईल.

हे देखील वाचा Second hand bullet: दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता या सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

INDvSA: अरे देवा! सामन्यावर पाऊसाचे सावट, मालिका विजयासाठी ऋषभ पंत अँड कंपनी उत्सुक.‌.

Male Infertility: मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

 शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

Hair care: अंघोळ करताना `या` चुका केल्यास पडू शकतं टक्कल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.