Hair care: अंघोळ करताना `या` चुका केल्यास पडू शकतं टक्कल..

0

Hair care: डोक्यावर घनदाट असणाऱ्या केसांमुळे माणसाचे सौंदर्य अधिक खुलते. अनेकांना डोक्यावर अधिक केस ठेवायची आवड असते. डोक्यावर काळेभोर आणि घनदाट केस असतील, तर आपण वेगवेगळ्या केस रचना करू (hair style) शकतो. डोक्यावर केसच नसतील आपण अनेकदा न्यूनगंड देखील बाळगतो. आणि म्हणून केसांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या डोक्याचे केस गळू शकतात, आणि आपल्याला टक्कल देखील पडू शकतं. जाणून घेऊया या संदर्भात अधिक. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

तुमच्या डोक्यावर असणारे घनदाट केस कधी पातळ होतील, आणि कधी तुमचा टक्कल पडतो, हे तुम्हाला देखील कळत नाही. केस गळतीच्या समस्या सर्वांनाच असतात, मात्र या समस्या का निर्माण होतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? केस गळतीची अनेक कारणे असली तरी, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आंघोळ करताना केस व्यवस्थित न धुण्याची पद्धत. होय, केस व्यवस्थित धुतले नाही, तर तुम्हाला केस गळतीची समस्या देखील उद्भवू शकते. आज आपण आंघोळ करताना केस धुण्याची कोणती योग्य पद्धत आहे ती सविस्तर जाणून घेणार आहोत.

माणसाच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा, हे देखील माहिती नसते. त्यापैकीच एक म्हणजे केस धुण्याची पद्धत. आंघोळ करताना केस कसे धुवायचे? हे तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर केसांची निगा कशी राखायची, केसाला कोणते प्रॉडक्ट लावायचे, अशा अनेक गोष्टीं तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपले केस गळत आहेत, तर तुम्ही समजुन जा आपली अंघोळ करताना केस धुण्याची पद्धत चुकीचे आहे.

हलक्या हातानं केस धुवा 

आंघोळ करताना आपण अनेकदा पाहतो, डोक्यावर पाणी न घेताच अनेकजण हातावर शाम्पू घेऊन डोक्याला जोरजोरात चोळतात. या पद्धतीने तुमच्या डोक्याचे केस गळण्याची समस्या आणखीन वाढू शकते. सहाजिकच त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डोक्यावर पाणी टाकून तुमचं डोकं ओलं करणे आवश्यक आहे. तुम्ही डोकं ओलं केल्यानंतर, एका मगात शाम्पू घ्या. त्यात थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण करून घ्या. ही प्रक्रिया तुम्हाला अधिक त्रासदायक आणि वेळ खर्चिक वाटत असेल तर तुम्ही शाम्पू हातामध्ये घेऊन शाम्पूचा फेस करून हळूवारपणे केसाला लावू शकता.

ही आहे कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत

शाम्पू लावल्यानंतर अनेक जण आपले केस मुलायम होण्यासाठी कंडिशनरचा वापर करतात. अनेक जण कंडिशनरचा वापर करताना केसांच्या मुळापर्यंत कंडिशनर वापरतात. आता कंडिशनर वापरण्याची ही चुकीची पद्धत आहे. कंडीशनर नेहमी शाम्पू लावून झाल्यानंतर, लांब केसांना हळुवारपणे लावायचा असतो. कंडिशनर आपल्या मुळापर्यंत जाऊ नये, याची काळजी घेऊनच कंडिशनरचा वापर करणे उचित राहतं. यामुळे आपल्या केसांच्या मुळांना अधिक केमिकलचा सामना करावा लागत नाही.

आठवड्यातून फक्त तीनदा शाम्पू वापरा.

अनेकांना अंघोळ करताना दररोज शाम्पू वापरण्याची सवय असते. मात्र ही सवय चुकीचे आहे. यामुळे आपल्या केसांना अधिक केमिकलचा सामना करावा लागतो. आणि यामुळेदेखील आपले केस गळण्याची समस्या उद्भवते. आणि म्हणून आंघोळ करताना नेहमी आठवड्यातून तीनच वेळा शाम्पू वापरणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमचे केस गळत असतील, तर याचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे.

योग्य शाम्पू वापरा

अनेकांना नेहमी शाम्पू बदलण्याची सवय असते. अनेक जण लोकल ब्रँडचे देखील शाम्पू युज करतात. मात्र यामुळे देखील तुमच्या केस गळतीची समस्या अधिक उद्भवू शकते. बाजारातून शाम्पू खरेदी करताना नेहमी शाम्पूमध्ये कोणकोणते घटक आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. जर तुमच्या केसमधे कोंडा असेल, तर तो नाहीसा करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपण घेतलेल्या शाम्पूमध्ये हे घटक आहेत का? याची देखील पाहणी करणं आवश्यक ठरतं.

गरम पाण्याने केस धुवू नका

जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तर तुमच्यासाठी ही धोकादायक बाब आहे. अनेक जण तिन्हीं ऋतुमध्ये गरम पाण्याने अंघोळ करत असतात. अनेकांना ही सवय लागून गेलेली असते. मात्र केस धुताना नेहमी कोमट पाण्याने किंवा गार पाण्यानेच केस धुणे आवश्यक आहे. अगदी हिवाळ्यात देखील तुम्ही केस थंड पाण्यानेच धुणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या केसांची निगा व्यवस्थित राहते, शिवाय केस गळती देखील थांबते.

हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये he पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Viral video: खोड काढली दुसऱ्याने आणि शिकार झाला वयोवृद्ध! यामुळे वळूने वृद्धाला शिंगावर घेऊन चेंडूसारखं हवेत फेकून दिलं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.