jalna jal akrosh morcha: जालन्यात जल आक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीसांनी भाडोत्री महिला आणल्याचं उघड: ऑडिओ क्लिप व्हायरल..

0

jalna jal akrosh morcha: भाजपाने मराठवाड्यातील पाणी प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारला (maha Vikas aghadi government) चांगलंच घेरलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये (Aurangabad) भाजपने जल आक्रोश मोर्चा (jal akrosh morcha) काढल्यानंतर, आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जालना (Jalna) शहरात देखील भारतीय जनता पार्टीकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. मात्र आता या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील आक्रोश मोर्चासाठी पैसे देऊन महिलांना बोलवल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अग्नीपथ योजनेअंतर्गत देशातील या तरुणांना चार वर्ष करता येणार देशसेवा; 40 हजार पगारासह मिळणार अनेक सुविधा..

कोणतही आंदोलन किंवा मोर्चा हातामध्ये घेतल्यानंतर, भारतीय जनता पार्टी तो यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतं. याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. भाजपचा सभेला नेहमीच तुफान गर्दी असते. पैसे देऊन सभेला लोकं बोलावल्याचा आरोप अनेकदा विरोधकांकडून केले गेले आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप ही नवीन बाब नाही. मात्र जालनामध्ये जल आक्रोशसाठी प्रति महिला दोनशे रुपये देऊन गर्दी करण्यात आल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

नेहमी प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी या जलआक्रोश मोर्चात महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका आणि गंभीर आरोप देखील केले. पाण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सुरू केलेल्या योजना या सरकारने बंद केल्याने मराठवाड्यात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही सुरू केलेल्या योजना सुरू ठेवल्या असत्या तर, पाण्याची समस्या निर्माण झाली नसती.

महाविकासआघाडी हे सरकार उद्धव ठाकरे चालवत नाहीत, उद्धव ठाकरे गाडी चालवतात. हे सरकार भगवान भरोसे चाललं आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा, मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त व्हावा याकरिता ‘मराठवाडा ग्रीड’ ही योजना तयार करण्यात आली होती. या योजनेनुसार मराठवाड्यामध्ये असणारी 11 धरणे एकमेकांना जोडून प्रत्येक घरात नळ देण्याचा आमचा मानस होता. या योजनेचे डेंटर देखील काढण्यात आले होते. मात्र महा विकास आघाडी सत्तेत आल्यानंतर, या सरकारने या योजनेचा खू न केला. असा देखील गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जालन्यात काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाची जोरदार चर्चा होत असतानाच, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीने जालन्यात काढलेला जल आक्रोश मोर्चात पैसे देऊन महिलांना जमवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रति दोनशे रुपये प्रमाणे पैसे देऊन महिलांना बोलावण्यात आल्याचे, या व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप भाजपचे माजी नगरसेवक सुनील राठी यांची असल्याचं बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक तरूण एका महिलेशी संभाषण करत असल्याच ऐकायला मिळत आहे. या महिलेशी फोनवर बोलताना हा तर म्हणत आहे, किती महिला तुम्ही आणू शकता? लक्कडकोटच्या चौकात १५ ते २० मिनिटांत जमा करा. हवं तर घेण्यासाठी गाडी पाठवतो. अशा आशयाची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हे देखील वाचा या सरकारी योजनेत फक्त गुंतवा 210 रुपये, आणि आयुष्यभर दरवर्षी मिळवा 60 हजार पेन्शन

 व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.