Aam aadami party: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर फुकटच्या जेवणावरून शिक्षकांमध्ये झाला राडा; एकमेकांच्या प्लेटही हिसकावल्या..

0

Aam aadami party: कुठल्याही समारंभात गेल्यानंतर, आपण जेवणाचा अस्वाद हा नेहमीच घेत असतो. यासाठी आपण रांगेत उभा राहून व्यवस्थित जेवण घेतो. लग्न समारंभ असेल, किंवा इतर कुठल्याही समारंभांमध्ये लहान मुलं ही नेहमी मधूनच जेवण घेतात. या लहान मुलांना कोणी बोलतही नाही, अनेकजण समजून घेतात. मात्र जर तुम्हाला जेवणावरून शिक्षकांनीच (teachar) राडा घातला, एकमेकांच्या फ्लेट हिसकावून घेतल्या, असं कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना, मात्र ही घटना पंजाबमध्ये घडली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( social media) तुफान व्हायरल झाला आहे.

आम आदमी पार्टीचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी सरकारी शाळेतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना शाळेच्या सुधारणाविषयी चर्चा करण्यासाठी एक मीटिंग आयोजित केली होती. हा कार्यक्रम एका आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर जेवणाची देखील सोय करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर, शिक्षकांनीच जेवणासाठी जोरदार राडा घातल्याचे समोर आले आहे. जेवण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची रांग न लावता शिक्षकांनी जोरदार राडा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, आता या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

जेवणासाठी शिक्षकांनी राडा घातल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान बाहेर झाला असून, हा व्हिडिओ पाहताना तुमचे देखील हसू आवरणार नाही. शिक्षक हे नेहमी संवेदनशील आणि शिस्तप्रिय असतात, असे आपण नेहमी ऐकतो. मात्र जेवणावरून या शिक्षकांनी शिस्त वेशीला टांगत जोरदार राडा केला. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जेवण करणं हे प्रत्येकाला आवडत असतं. विविध पदार्थ असल्याने अनेक जण या जेवण आनंदाने करत असतात. यात नवीन काही नाही. मात्र जेवणावरून शिक्षकच राडा करतील, अशी घटना क्वचितच ऐकायला मिळेल.

काम घडलं नेमकं?

नवनियुक्त पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाब मधील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व सरकारी शाळेचे कर्मचारी,शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासोबत चर्चा आयोजित केली होती. शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर, जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर, शिक्षक आणि मुख्याध्यापक डायनिंग हॉलकडे गेले. मात्र डायनिंग हॉलमध्ये गेल्यानंतर, कुठल्याही प्रकारची शिस्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये पाहायला मिळाली नाही.

शिक्षक समाजाला आणि विद्यार्थ्यांना शिस्त शिकवतात, असं बोललं जातं. मात्र जेवणासाठी हे शिक्षक सगळी मर्यादा ओलांडून जेवणावर तुटून पडले. यासंदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत शिक्षक एकमेकांची प्लेट ओढताना देखील पाहायला मिळत आहे. एवढच नाही तर शिक्षक एकमेकांना कोपराने मारताना देखील या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. फक्त शिक्षकच नाही, तर शिक्षीका देखील या प्लेटवर तुटून पडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ हॉटेलच्या एका कर्मचार्‍याने शूट केला असल्याचं, बोललं जात आहे.

काय म्हणाले नेटकरी? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अभिजित गुहा या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताना अनेकांना हसू आवरत नसल्याचे दिसून येत असून, या व्हिडिओखाली अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षक नेहमी कोंबडा बनवत असल्याचं आपण ऐकलं असेल, किंवा आपल्याला अनुभव देखील असेल. आणि याचाच धागा पकडून, एका युजर्सने या शिक्षकांचा कोंबडा बनवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे, या शिक्षकांना प्रचंड भूक लागलेली आहे. नक्की हे जेवण किती वाजता दिले, हे समजून घेणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

Aadhaar Updation: आधार कार्ड vr जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही या योजनांचा लाभ; या सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख..

Driving License: सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! Driving License काढण्यासाठी आता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही..

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च केल्यास, पोलीस ठोकतील बेड्या..

Hero MotoCorp: दुचाकीस्वारांची पेट्रोलच्या खर्चातून होणार सुटका; आता Hero Splendor इलेक्ट्रिक रूपात..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.