Viral video: नशेत फुल्ल टल्ली होऊन तरुणी गेली विषारी सापाला पकडाय; पण… ,” काय घडलं नेमकं तुम्हीच पहा व्हिडिओ…

0

Girl Catching Snake: सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सोशल मीडियाच्या या जमान्यात तुमच्या आसपास घडणारी छोटी मोठी गोष्ट देखील कधी व्हायरल होईल, हे तुम्हालाही कळणार नाही. सोशल मीडिया जितका चांगला आहे, तितकाच तो घा त क देखील असल्याचे बोलले जातं. सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि धक्कादायक व्हिडिओ देखील व्हायरल होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहेच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नशेत फुल टल्ली होऊन तरुणी एका विषारी सापाला पकडाय गेल्याचं या व्हीडिओत पाहायला मिळत असून, हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकल्याचं दिसत आहे.

साप पकडणे म्हणजे पोरखेळ नाही, सर्पमित्र देखील साप पकडताना आपला जीव मुठीत धरून साप पकडताना पाहायला मिळतात. साप पाहिल्यावर अनेकजण कसे पळतात, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. घरात किंवा आसपास कुठे साप निघाला तर, तिथे किती जण गोळा होतात, हे आपल्याला माहीतच आहे. अनेक जण सर्पमित्राशी संपर्क करतात. आणि सपाला घेऊन जायला लावतात. जवळपास हीच प्रोसेस साप निघाल्यावर सर्वत्र पाहायला मिळते, पण त्याला पकडण्याच्या कोणी नादी लागत नाही.

साप (snake) पकडणे ही एक कला असली तरी, ती आपल्या जीवावर बेतू शकते. यात सर्पमित्र देखील वाचले नाहीत. सोशल मीडियावर या संदर्भातल्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, हातात सिगारेट असलेली नशेडी मुलगी साप पकडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. सापाचे आकारमान पाहीले तर, अनेकांचा काळजाचं पाणी होईल, एवढा हा विशाल साप असून देखील, नशेत असणार्‍या मुलीला कसलीही भीती वाटत असल्याचं, व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं

रस्त्याच्या मध्यभागी भलामोठा साप आपल्याच धुंदीत गाढ झोपेत होता. रस्त्याच्या मध्येच साप असल्याने अनेक जण आपल्या गाडीवरून रस्ता सोडून जात असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर काहीजण भितीमुळे रस्ता क्रॉस देखील करत नसल्याचं, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तेवढ्यात एक सुंदर तरुणी हातात सिगरेट घेऊन आपल्याच धुंदीत या सापाकडे येताना देखील पाहायला मिळत असून, आता नक्की काय होणार असा प्रश्न युजर्सना पडल्याचं दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल, साप रस्त्याच्या मध्येच पडला असल्याने, नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा त्रास होत असल्याचं देखील यावेळी पाहायला मिळत आहे. तेवढ्यात एक मुलगी तिच्याच स्टाईलमध्ये सापाजवळ हातात हातात सिगरेट आणि जबरदस्त अटीट्युड दाखवत सापाच्या तोंडाला गचकन पकडते, आणि शेजारी शेतात सोडून देते. मात्र ही मुलगी सर्पमित्र असून, तिचं नाव जॉकी असल्याचं समजतंय. एका हातात सिगरेट आणि एका हाताने सापाच्या तोंडाला पकडून या मुलीने सापाला सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं, मात्र हे करत असताना तिच्या चेहऱ्यावर किंचितही भीती जाणवली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ब्राझीलमधला असल्याचं बोललं जातंय. जॅकली नावाच्या मुलीने केलेला पराक्रम पाहून उपस्थित असणाऱ्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र या घटनेनंतर अनेकांनी या मुलीचं कौतुक देखील केलं आहे. विशेष म्हणजे, ही मुलगी सापाला सुरक्षित ठिकाणी सोडून दिल्यानंतर आपल्याच धुंदीत निघूनही जात असल्याचे या व्हीडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या मुलीचा कारनामा पाहून सोशल मीडियावर अनेकांनी लाईक आणि कमेंट चा पाऊस पाडला आहे.

काय म्हणाले नेटकरी

मुलीने केलेला कारनामा पाहून अनेकांनी, तिचे तोंड भरुन कौतुक केले आहे, तर काहींनी तिला ‘न’ ‘शे’ ‘डी’ देखील म्हटलं आहे. एका युझर्सने या व्हिडिओला लाईक करताना म्हटले आहे, मला तर साप दिसलाच नाही. या सुंदर मुलीकडे पाहण्यातच मी मग्न होतो श. या व्हिडिओत साप देखील आहे, हे मला व्हिडिओ रिपीट करून पाहिल्यानंतर समजलं. दुसऱ्या एका यूजर्सने यावर कमेंट करताना म्हटलं आहे, या मुलीचा साप पकडण्याचा अंदाज आणि स्टाईल मला खूप आवडली.

हे देखील वाचा केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय! ‘ही’ आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर; ‘असं’ करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि योजनेचा घ्या लाभ..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर ‘असा’ पहा ‘फेरफार उतारा’ अगदी सोप्या भाषेत…

Viral Video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; भुकेल्या मगरीला खाऊ घालत होता मासा, पण मासा सोडून मगरीने.. तुम्हीच पहा व्हिडीओ…

Viral Video: ‘या’ कारणामुळे म्हशीने सिंहाला ताणून ताणून बेजार केलंय, व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा पहाच..

हंबरडा फोडणाऱ्या आजोबांचं एकाने नाही ऐकलं; उसाचा क्रेशर बुलडोजरने तोडून टाकला; डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल…

सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ..

घरकुलासाठी अर्ज केलाय? घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.