‘या’ कारणांमुळे उडालाय उष्णतेता भडका; ..उन्हात ‘घ्या’ ही काळजी, अन्यथा उष्माघातामुळे होईल..
इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळा हा सर्वांनाच नकोनकोसा वाटत असतो. त्याचा खूप मोठा परिणाम सूक्ष्मजीव आणि प्राणीमात्रांवर देखील होताना पाहायला मिळतो. या ऋतूचा फटका माणसांनादेखील झाल्याचं पाहायला मिळतं. आता महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यात उष्णतेचा मोठा भडका उडाला असून, येत्या तीन-चार दिवसात उष्णतेचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदी महासागर त्याचबरोबर लगतच्या असणाऱ्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. आणि आता याचा परिणाम म्हणून उष्णतेचा भडका उडाला आहे.
हिंदी महासागर त्याचबरोबर लगतच्या असणाऱ्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत, हे चक्रीवादळात परावर्तीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता त्याचा परिणाम तापमानवाढीवर झाला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासह सोलापूर, नांदेड विदर्भ, खानदेश, परभणी, मुंबईमध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. आता हा पारा आणखीन चढण्याची शक्यता वर्तवली आहे.
हिंदी महासागर त्याचबरोबर लगतच्या असणाऱ्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने निकोबार बेटांवर त्याचा परिणाम दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निकोबार या प्रदेशात जोरदार वारे, मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार असल्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता वातावरणात देखील होत आहे. देशात अनेक भागांमध्ये उष्णतेच्या पारा आणि तीव्र उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रात देखील उष्णतेची लाट उसळली आहे. या भागात तब्बल ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भ आणि सोलापूरला सर्वाधिक झळ
मार्चमध्ये विक्रमी तापमानची नोंद झाली आहे. त्याच बरोबर या तापमानाची सर्वाधिक झळ ही सोलापूरसह विदर्भाला बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये उष्णतेचा पारा आणखीनच चढणार असल्याचे बोललं जात आहे. दोन दिवसांपासून तापमानाचा आकडा तब्बल ४२.९ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. ४३ अंश सेल्सिअस तापमानास चंद्रपूरची महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहराची नोंद झाली. त्याचबरोबर राजस्थानमध्ये देशात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे पहायला मिळाले आहे. राजस्थानमध्ये हे तापमान तब्बल ४३.५°ची नोंद झाली.
पुण्यात इतिहासात पहिल्यांदाच…
इतिहासात यापूर्वी कधी मुंबई, ठाणे या शहरात कधीही ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नव्हती. मात्र मार्चमध्ये या शहरात तापमानाचा नवा रेकॉर्ड झाला आहे. विशेष म्हणजे पुण्याच्या इतिहास कधीही ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नव्हती. मात्र हा देखील नवा रेकॉर्ड पुण्याने नोंदवला. पुण्यासोबत मराठवाड्यात देखील उष्णतेने उच्चांक गाठला. औरंगाबादमध्ये ३९.५ बीडमध्ये ४०.१° वर तापमान गेल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरमध्ये देखील तापमानाने उच्चांक गाठला. काल सोलापूरमध्ये ४१° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
..तर उष्माघातामुळे होईल मृत्यू
इतर ऋतूंच्या तुलनेत आपल्याला उन्हाळ्यामध्ये शरीराची जास्त काळजी घ्यावी लागते. खासकरून लहान मुले आणि वयोवृद्ध मंडळींनी उन्हाळ्यात अधिक काळजी करणं गरजेचं आहे. उष्णतेची लाट उसळल्यानंतर ऊन्हात जाणं टाळलं पाहिजे. खासकरून लहान मुले आणि जास्त वय असणाऱ्या लोकांनी याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात आपल्याला शरीराचं तापमान जेवढे जास्त थंड ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, उन्हाळ्यात आपल्या शहरातलं पाणी कधीही कमी होता कामा नये. मुबलक पाणी प्यायला पाहिजे. जरी तहान लागली नाही, तरी देखील पाणी सतत पिल्याने आपण या उष्णते पासून आपल्या शरीराला वाचवू शकतो.
लिंबू सरबत, ताक, ORS, अशी शरीराला थंड ठेवणारी पेये आपण या काळात पिण्यावर भर दिला पाहिजे. चहा कॉफी पित असाल तर, तुम्ही अशा तापमानात हे सर्व बंद करणं आवश्यक आहे. फक्त चहा-कॉफीच नाही तर मद्यप्रेमींसाठी देखील उन्हाळा खूप घातक ठरू शकतो. जर तुम्ही नियमित मद्यपान करत असाल तर, तुम्हाला या काळात हे सगळं सोडावं लागणार आहे. मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक घेतल्याने माणसाच्या शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असतं. त्यामुळे उन्हाळ्यात हे बंद केलेलं बरं. साधारण दुपारी 12 ते 3 या वेळेत आपण उन्हात जाणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर तुमचा उष्माघातामुळे मृत्यू देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा मोदींना जमलं नाही ते बजाज यांनी करून दाखवलं; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, वाचा सविस्तर..
मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ…
पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली ‘तसली’ पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना..
Skin Care: उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल? तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम