मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ…

0

पंतप्रधान यांनी जन धन खाते उघडायला सांगितल्यानंतर, अनेकांनी जन धन खाते उघडले. ज्या लोकांनी हे खाते उघडले आहे, अशांसाठी आता एक महत्वाची आणि आनंद देणारी बातमी आहे. जन धन खाते असणाऱ्यांना आता प्रत्येक महिन्याला तब्बल तीन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून खाते धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जन धन खाते असणाऱ्या खाते धारकांना या योजनेचा लाभ पेन्शनच्या माध्यमातून हे पैसे दिले जाणार आहेत. या पेन्शन स्वरूपात मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० असणे आवश्यक आहे. या वयाच्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, तुम्हाला काही अटींची देखील पूर्तता करावी लागणार आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न हे महिना पंधरा हजारापेक्षा कमी असेल अशांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हे आहे योजनेचे स्वरूप

अठरा ते चाळीस वर्ष वयोगातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या नागरिकांचे वय १८ वर्ष आहे अशा नागरिकांना दर महिन्याला ५५ रुपये भरायचे आहेत. जर तुम्ही ही योजना आपल्या वयाच्या अठराव्या वर्षापासून सुरू केली असेल तर, तुम्हाला ३९,६०० रुपये भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर वय वर्ष तीस असणाऱ्या नागरिकांना वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला शंभर रुपये भरावे लागणार आहे. तसेच चाळीस वय वर्ष असणाऱ्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला २०० रुपये भरावे लागणार आहे. अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना एकूण या योजनेत ४८,००० हजार रुपये भरावे लागणार आहेत.

नागरिकांना ही रक्कम आपल्या वयाच्या साठ वर्षापर्यंत भरावी लागणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्या जन धन खाते धारकांचे वय वर्षे साठ पूर्ण झाल्यानंतर, नागरिकांना या योजनेची पेन्शन चालू केली जाईल. नागरिकांना प्रत्येक महिन्याला तीन हजाराप्रमाने प्रत्येक वर्षाला ३६ हजार रुपये मिळणार आहेत. २५ कोटींहून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘श्रम योगी मानधन’ योजनेची घोषणा पियूष गोयल यांनी १ फेब्रुवारीला केल्यानंतर याची अंमलबजावणी १५ फेब्रुवारीपासून करण्यात आली.

आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे जन धन खाते असणं आवश्यक आहे. लक्षात असूद्या जन धन खाते तुमच्याकडे नसेल तर, या योजनेचं लाभ तुम्हाला मिळणार नाही. जन धन खात्याबरोबरच तुमच्याकडे आधारकार्ड देखील आवश्यक आहे. विशेष म्हणजे, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या सगळ्या बॅंक बचत खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. लक्षात असूद्या, ज्या नागरिकांचे महिन्याचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे देखील वाचा पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली ‘तसली’ पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना…

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त…

‘या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर…

ई-केवायसी करणं बंधनकारक, अन्यथा पीएम किसान हप्ता होणार बंद; कशी कराल ई-केवायसी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

चित्ता आणि सिंहाची झाली कुत्र्यासारखी अवस्था; व्हायरल झालेले दोन्हीं व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले..

शपथविधीपूर्वीच आम आदमीचा बुरखा फाटला टराटरा; पंजाबच्या शेतकऱ्यांना केजरीवालचा दणका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.