पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली ‘तसली’ पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना…

0

पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या घटना आपण अनेक वेळा ऐकत आलोय, पहात आलोय. पोलिसांनी सापळा रचून अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याच्या विविध घटना सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अनेक जण पोलिसांचं कौतुक करताना देखील पाहायला मिळतात. मात्र एका पोलीस चौकीत काही पोलिसांना नागरिकांनी फारच विचित्र अवस्थेत, रंगेहाथ पकडल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर हाहाकार उडाला असून, अनेकांनी या घटनेवर जोरदार टीका केली आहे.

पोलीस वर्दीला काळिमा फासणारी घटना नाशिकमधील गंगापूर रोड, दादोजी कोंडदेव नगर परिसरात असणाऱ्या, पोलीस चौकीत घडली आहे. पोलीस चौकीतच पाच पोलिस कर्मचारी ऑन ड्युटीवर असतानाच चक्क मद्यधुंद अवस्थेत दारू पार्टी करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑन ड्युटीवर असताना या पोलिस कर्मचाऱ्यांनी अक्षरशः चौकीचा बार करून टाकल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रहिवाशांनी या मद्य पार्टीचा व्हिडिओ काढला असून, या पोलिस कर्मचार्‍यांवर आता कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

जाणून घेऊया सविस्तर

नाशिक मधील गंगापूर रोड दादोजी कोंडदेव नगर परिसरात असणाऱ्या पोलीस चौकीत 5 पोलीस कर्मचारी फूल नशेत दारू पार्टी करीत होते. ऑन ड्युटी पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस चौकीचा बार करून टाकला होता. मात्र तक्रार देण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि या घटनेचा सगळा भांडाफोड झाला. या निंदनीय घटनेचा व्हिडीओ देखील या रहिवाशांनी काढला आहे. आणि आता तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल देखील झाला आहे. पोलीस कामावर असताना वर्दीवरच दारू पार्टी करत असताना या व्हिडिओत दिसत आहे.

अशी पकडली डर्टी पार्टी

समोर आलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टवाळखोर पोरं दारू पिले होते आणि रस्त्याच्या मध्येच फुल्ल धिंगाणा घालत होते. या पोरांच्या मस्तीला कंटाळून स्थानिक नागरिक तक्रार देण्यासाठी गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असणाऱ्या ‘डी. के. नगर चौकीत’ आले. एक ज्येष्ठ नागरिक तक्रार देण्यासाठी आतमध्ये गेला, मात्र त्या ठिकाणी या नागरिकाला भलतच पाहिला मिळालं. पोलीस घाबरले, आणि यांनी बाहेर कुठे काही बोलू नये, म्हणून त्या नागरिकाला बेदम मारहाण देखील केली.

तक्रार देण्यासाठी अनेक नागरिक पोलीस स्टेशनमध्ये गेल्याने, ही निंदनीय घटना उघडकीस आली. यावेळी घडलेला हा सगळा प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. मात्र हा प्रकार आम्ही कैद करत असताना पोलिसांनी आम्हला धक्काबुक्की आणि मारहाण केली, अशी माहिती या रहिवाशांनी दिली आहे. आम्ही असं चित्र या पूर्वी कधीही पाहिले नाही, हे सगळा विचित्र प्रकार पाहून आम्हाला पाहिल्या पाहिल्याच धक्का बसला. मात्र आम्ही अनेकजण तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असल्याने, या निंदनीय घटनेचा भांडा फोड झाला. असं या नागरिकांनी सांगितले.

या चौकीत 5 पोलीस कर्मचारी आपल्या धुंदीत मग्न होते, आपण ऑन ड्युटी आहोत, याचे भान देखील या कर्मचाऱ्यांना राहिले नाही. आम्ही अनेकजण गेल्याने या पोलिसांना काय करावे हे सुचत नसल्याने, त्यांनी आम्हा सर्वांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले, नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

हे देखील वाचा  भन्नाट कॅमेरा आणि फीचर्स असणारे Vivo हे 5 स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येतात; जाणून घ्या सविस्तर…

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त…

या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर..

शपथविधीपूर्वीच आम आदमीचा बुरखा फाटला टराटरा; पंजाबच्या शेतकऱ्यांना केजरीवालचा दणका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण….

अजित पवारांनी केला गेम! अर्थसंकल्पात तब्बल 57 टक्के निधी राष्ट्रवादीच्या खात्याला; शिवसेनेला केवळ 16 तर कॉंग्रेसला..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! तरुणांच्या टोळक्याने भररस्त्यात तरुणीसोब केले अश्लील घाणेरडं कृत्य; व्हिडिओ व्हायरल..

आणखी चार महिने चिकनचे दर तेजीतच! ‘या’ कारणामुळे चिकनचा उडालाय भडका; वाचा सविस्तर....

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.