मोदींना जमलं नाही ते ‘बजाज’ यांनी करून दाखवलं; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, वाचा सविस्तर..

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट  होईल असं 2014 च्या लोकसभा निवडणुकीत म्हटलं होतं. मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली नाही. याउलट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे, पाहायला मिळत आहे. भारतला कृषिप्रधान देश म्हटलं जातं‌. मात्र या देशात शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नसल्याचं, आपण पाहतोय. देशातील बहुतांशी लोक शेतीवर (farming) अवलंबून असले तरी, शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह होताना दिसत नाही. कधी अवकाळी पाऊस, कधी निसर्ग कोपतो, तर कधी कमी पाऊस पडल्याने, हातातोंडाशी आलेलं पीकही नष्ट होतं. अशा अनेक समस्यांनी शेतकरी नेहमीच चिंतेत असतो.

मात्र अवकाळी पाऊस आणि निसर्ग हे शेतकऱ्यांच्या हातात नसल्याने त्याला कोणाचाही इलाज नाही. मात्र शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणं हे अनेकांच्या हातात आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी आणि पीके घेण्यासाठी मुबलक पाणी असेल, तर त्याच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होऊ शकते. देशात असे अनेक भाग आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला मुबलक पाणी मिळत नाही. आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांना वर्षातून एकच ठराविक पीक घ्यावे लागते. मात्र नागपूरमधील वर्ध्याच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन’ (malnayan jamanalal Bajaj foundation) मदतीमुळे दुप्पट झाले आहे. याचे सगळे श्रेय हे कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनला जात आहे. नागपूरपासून (Nagpur) साधारण ७० किमी अंतरावर वसलेल्या आणि नेहमी दुष्काळ असणाऱ्या वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले कसे? असा प्रश्र्न अनेकांना पडला असेल, मात्र या विषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.

                ..असा झाला कायापालट

विदर्भामध्ये मोठा दुष्काळ पडतो, या विषयी कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. वर्ध्यामधील शेतकऱ्यांना देखील उन्हाळ्यात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो. या भागात इतर भागांच्या तुलनेत उन्हाळा प्रचंड मोठ्या प्रमाणत असल्याने, नद्या लवकर कोरड्या पडतात. या भागातील बहतांश शेतकरी हे कालव्यावरच अवलंबून आहेत. आपल्या शेताला पाणी देण्याचा हा त्यांच्याकडे एकमेव स्त्रोत असल्याने, या शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं.

या भागात दरवर्षी सरासरीच पाऊस होत असतो. मात्र पाऊस जास्त झाला तरी, देखील या भागात प्रचंड उन असल्याने या भागातील नद्यांचे पाणी मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत कोरडे झाल्याचे पहायला मिळते. मात्र या शेतकऱ्यांच्या मदतीला मेघराज्यासारखं कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन धाऊन आलं. आणि या शेतकऱ्याच्या जीवनमाचा कायापालट करून गेलं. ‘कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनने सरकारची जरी मदत घेतली असली तरी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनने नद्यांवर बांधलेल्या ‘चेक डॅम’मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे.

                   काय आहे चेक डॅम

नदीच्या मध्यभागी पाणी थांबवण्यासाठी बांधलेली जी रचना असते, त्यास ‘चेक डॅम’ असं म्हंटले जातं. चेक डॅममुळे एकदम वाहून जाणारं पाणी थांबत थांबत जात. आपण पाहतो, पाऊस पडल्यानंतर नदीचे पाणी एकदम वाहून जात असतं, ते आता साचत असल्याने, जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. एका नदीवर एक चेक डॅम बांधण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो. एकदा का हे बांधून झाले की, नदी शेजारी असणाऱ्या शेतीचा कायापालट झाल्याचे पाहायला मिळते.

या धरणामुळे शेतातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते, सोबतच नदीमध्ये अधिक काळ पाणी साचून राहते. सहाजिकच यामुळे, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत होती, ती या प्रकल्पामुळे भासत नाही. शिवाय चांगला पाऊस पडला, तर बाराही महिने कुठलंही पीक घेतलं तरी, त्या पिकाला पाणी कमी पडत नाही. आणि यामुळे शेतकऱ्याला वर्षातून तीन पिकं घेता येतात. साहजिकच यामुळे वर्ध्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नदीमध्ये दिर्घकाळ पाणी राहिल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी देखील निघत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या उपक्रमामुळे या नदी लगत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून गेले आहे.

                  काय सांगतात स्थानिक 

वर्ध्यातील शेतकरी रणजित यांच्याशी बातचीत करताना त्यांनी या प्रकल्पामुळे काय बदल झाले याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रकल्पापूर्वी याठिकाणी सिंचनाची गरज ही फक्त नदी त्याचबरोबर विहिरीमधूनच होत होती. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा आणि हिवाळ्याचे दोन महिने विहीर आणि नदी दोन्हीं ही कोरडी पडायची. आणि म्हणून, आम्हला कमी पाणी लागणारे एकच पीक घ्यावे लागत होते. मात्र ‘कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन’ने नदीत चेक डॅम बांधून ऐतिहासिक काम केले. आणि आमचा कायापालट झाला. चेक डॅम बरोबरच त्यांनी विहिरीचे पुनरुज्जीवन देखील केले. या प्रकल्पामुळे नदीत आता दीर्घकाळ पाणी साचून राहते. पूर्वी कितीही पाऊस झाला, तरी पाणी वाहून जायचे, आणि नदी कोरडी पडायची.

शेतकरी म्हणतात, या पूर्वी आम्ही वर्षातून फक्त एकदाच पिकं घ्यायचो. पण आता या प्रकल्पानंतर आम्ही वर्षात ३ पिके घेतो. तरीदेखील आमच्या शेतीला पाणी कमी पडत नाही. अशी माहिती काही स्थानिक शेतकरी देतात. पूर्वी इथला बहुतांश शेतकरी हा केवळ कापूस किंवा सोयाबीन पिकावत होता. मात्र आता आम्ही गहू,भाजीपाला, हरभरा, ऊस अशी अनेक पिके पिकवतो. आम्ही यापूर्वी एकरमधून वर्षाला ४० ते पन्नास हजार कमवायचो. आता मात्र आमच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे. एवढंच नाही तर, मिश्र शेतीतून देखील वर्षाला तब्बल तीनपट उत्पन्न कमवणारे शेतकरी देखील आमच्यात आहेत.

               बजाज कडून ही झाली कामे

कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून नद्यांचे पुनरुज्जीवनाची कामे झाली. त्याचबरोबर साचलेली माती बाहेर काढणे, किनारे मजबूत करणे, चेक बंधारे बांधणे, अशी अनेक महत्वपूर्ण कामे बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून झाली. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा नद्यांमध्ये जास्त काळ पाणी टिकून राहिले पाहिजे हा होता. मात्र या बरोबरच अनेक फायदे देखील झाले. ज्यांच्यामुळे आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत झाली. पूर्वीपेक्षा बराच काळ पाणी साचल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी देखील आता वाढण्यास मदत होत आहे. जागेवर चेकडॅमसारखी मातीची रचना देखील बनवण्यात आली असल्याने, मोठ्या प्रमाणात रुंद आहे. त्यामुळे शेतकरी यावरून ट्रॅक्टर घेऊनही जात आहेत.

हे देखील वाचा इरफान पठानच्या पत्नीचा मनमोहक चेहरा आला समोर; सुंदरता पाहून चाहते झाले घायाळ..

मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ..

पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली  ‘तसली’ पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना! व्हिडिओ व्हायरल..

भन्नाट कॅमेरा आणि फीचर्स असणारे Vivo हे 5 स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येतात; जाणून घ्या सविस्तर…

आणखी चार महिने चिकनचे दर तेजीतच! ‘या’ कारणामुळे चिकनचा उडालाय भडका; वाचा सविस्तर..

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त..

Royal Enfield Classic 350: आणि Java या दोन्हीं बाइकमध्ये कोणती सर्वोत्तम आहे? जाणून घ्या दोन्हींचेही फीचर्..

या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.