इरफान पठानच्या पत्नीचा मनमोहक चेहरा आला समोर; सुंदरता पाहून चाहते झाले घायाळ

0

अलीकडच्या काळात बॉलीवुड (Bollywood) पेक्षाही जास्त  क्रिकेटपटूंच्या फॅमिली (cricketers family) आणि खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये  उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. पूर्वी बॉलीवूड कलाकारांच्या रियल लाईफ विषयी जाणून घेताना अनेकजण धडपड करताना पाहायला मिळायचे. मात्र आता लाईम लाईटचा सगळा फोकस क्रिकेटपटूंनी आपलल्याकडे वळवल्याचे पाहायला मिळते.

अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेटपटूंच्या स्टाईल्स बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार देखील कॉपी करताना पाहायला मिळतात. बॉलीवूड प्रमाणेच आता अनेकांना क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यात काय चाललंय, त्यांची आई-वडील पत्नी कशी दिसतात, याची उत्सुकता असते. तसं पाहायला गेलं तर, बॉलीवुड आणि क्रिकेट(Bollywood and cricket)हे आता समीकरण बनलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी क्रिकेटपटूंशी लग्न केल्याचे देखील आपल्याला माहितीच आहे.

क्रिकेटपटूंची पत्नी( cricketers wife) कशी दिसते, हे जाणून घेण्यासाठी मोठा चाहतावर्ग उत्सुक असल्याचं दिसतं. विराट कोहली,(Virat Kohli) युवराज सिंग (Yuvraj Singh) हरभजन सिंग (Harbhajan Singh) मोहम्मद अजहरुद्दिन (mohmad azharuddin) या दिग्गज खेळाडूचे बॉलीवूड कनेक्शन (Bollywood connection) आपल्याला माहितीच आहे. अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी (Sangita bijlani) यांची लव्ह स्टोरी तर नाईंटीनच्या दशकात प्रचंड गाजली होती. संगीता बिजलानी अभिनेत्रीचे सलमान खान (Salman khan) सोबत देखील रिलेशन असल्याचं बोललं जातं. मात्र माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिनने संगीता बिजलानी हिच्याशी कशा पद्धतीने लग्न केलं होत, याविषयी अनेकांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

हरभजन सिंग, विराट कोहली, युवराज सिंग या खेळाडूंनी बॉलीवूडच्या अभिनेत्रीशी लग्न केलं, हे आपल्याला माहिती आहे. या बॉलिवूडच्या अभिनेत्र्या असलेल्यामुळे या कशा दिसतात, हे आपण लहानपणापासूनच पाहत आलो आहोत. मात्र भारताचे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांच्या पत्नी कशा दिसतात? हे आपल्याला अजूनही माहिती नाही.  त्यातलंच एक नाव म्हणजे भारताचा माजी प्रसिद्ध ऑलराऊंडर इरफान पठाण.

भारताचा माजी ऑल राऊंडर इरफान पठाण सध्या कॉमेंट्री करताना पाहायला मिळतो. कॉमेंट्री बरोबरच तो सोशल मीडियावर देखील कमालीचा अक्टिव असतो. इरफान पठाण हा नेहमी सोशल मीडियावर आपल्या पत्नीचे हिजाब परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियावर इरफान पठानची पत्नी खूप सुंदर असल्याची चर्चा देखील अनेक वेळा रंगली आहे. अनेकांनी इरफान पठानच्या पत्नीच्या डोळ्याची स्तुती करताना इरफान पठाण यांच्या पत्नीचा चेहरा खूप सुंदर दिसत असणार, अशाही कमेंट्स आपण नेहमी वाचतो.

मात्र इरफान पठाण (Irfan Pathan) यांच्या पत्नी ‘सफा बेग’ (safa Ben) यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने इरफान पठानची पत्नी ‘सफा बेग’ यांचे सौंदर्य पाहून अनेक जण घायाळ झाले आहेत.  इरफान पठाणच्या पत्नी सफा बेगने मॉडेल म्हणून देखील काम केलं आहे. चाहत्यांच्या माहितीसाठी सफा बेग ही प्रसिद्ध सौदी मॉडेल (Model) होती. तसं पाहायला गेलं तर, ती मूळची हैदराबादचीच आहे. मात्र कामानिमित्त तिचे संपूर्ण कुटुंब सौदीमध्ये स्थाईक झाले. स्थायिक झाल्यानंतर इरफानच्या पत्नीचे सौदी मध्येच शिक्षण देखील पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मोडेल करू लागली. मात्र लग्नानंतर आता ती एक उत्कृष्ट गृहिणी म्हणून काम पाहते.

इरफान पठानची पत्नी ‘सफा बेग'(phone Pathan wife safa Ben) ही कमालीची सुंदर असून देखील, ती कधीही लाइमलाइटमध्ये राहत नाही. लाइमलाइटमध्ये राहणं तिला पसंत नसल्याचं बोललं जातं. त्यामुळे ती सोशल मीडियावर आपले  फोटोदेखील पोस्ट करत नाही. मात्र इरफान पठाणला प्रोफेशनमुळे बाहेर जावं लागत असल्याने, तो आपल्या पत्नीला देखील सोबत घेऊन जातो. आणि काही महत्त्वाच्या प्लेसेसवर गेल्यानंतर हे दोघेही आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. आणि आता यातलेच सफा बेग यांचे काही फोटो पाहून त्यांच्या सुंदरतेचे वर्णन करता येऊ शकत नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

हे देखील वाचा भन्नाट कॅमेरा आणि फीचर्स असणारे Vivo हे 5 स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येतात; जाणून घ्या सविस्तर..

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त..

शपथविधीपूर्वीच आम आदमीचा बुरखा फाटला टराटरा; पंजाबच्या शेतकऱ्यांना केजरीवालचा दणका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.