Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या ‘या’ फोनने बाजारात केलाय कहर

0

देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. खास करून तरुणांमध्ये स्मार्टफोनची मोठी क्रेझ असल्याचं दिसून येतं. बाजारात नवनवीन स्मार्ट फोन आले की, तरुणवर्ग या स्मार्टफोन विषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. स्मार्टफोच्या अनेक कंपनी असल्यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांपुढे अनेक ऑप्शन उपलब्ध असतात. आणि म्हणून, नेहमी स्मार्टफोन खरेदी करताना, कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन घ्यायचा,आणि काय फिचर्स असावेत, किंवा कोण उत्तम फिचर्स देतंय, याचा विचार अनेक जण करत असतो.

अनेक वर्ष ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी सॅमसंग स्मार्टफोन कंपनी आता बाजारात आपला नवीन ब्रँड आणणार आहे. सॅमसंगने आतापर्यंत त्यांच्या गॅलेक्सी ए सिरिजमध्ये अनेक तगडे स्मार्टफोन दिले आहेत. सॅमसंग या स्मार्टफोनला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंत देखील केलं आहे. मात्र आता सॅमसंग गॅलेक्सी ए सिरीजचा आणखी एक ब्रँड लवकरच बाजारात येणार आहे. Samsung Galaxy A73 5G असं या नव्या स्मार्टफोनचं नाव असून हे Samsung Galaxy A72 फोनचे नविन अपडेट व्हर्जन असणार आहे

Samsung Galaxy A73 5G फोनमध्ये तब्बल १०८ Mp कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा बरोबरच अनेक भन्नाट फिचर देखील सॅमसंगने या स्मार्टफोनला प्रोवॉइड केले आहेत. स्मार्टफोन खरेदी करताना आपण प्रोसेसर बॅटरी बॅकअप कॅमेरा या सगळ्यांचा विचार करतो या सगळ्यांमध्ये सॅमसंगने आपल्या ग्राहकांना कुठेही तक्रार करण्याची संधी दिली नसून, या सर्व बाबींचा विचार करूनच हा स्मार्टफोन बनवल्याचे पहिला मिळत आहे.

सॅमसंग स्मार्ट फोन कंपनी Samsung Galaxy A73 5G या फोन बरोबरच Galaxy A33 5G, Galaxy A53 5G हे नवीन दोन स्मार्ट फोन बाजारात आणणार आहे. हे स्मार्टफोन नक्की कधी पर्यंत बाजारत येणार या विषयी तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, बरोबरच ना, पण तुम्हाला जास्त वाट पहावी लागणार नाही, हे तीनही स्मार्ट फोन याच महिन्यात येणार आहेत.

फीचर्स

Samsung Galaxy A73 5g या फोनला १०८०×२४०० पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आला आहे त्याच बरोबर ७ इंचाचा बडा डिस्प्ले देण्यात आल्याचं समोर आले आहेत. त्याचबरोबर हा डिस्प्ले AMOLED, 90Hz असणार आहे. विशेष म्हणजे, रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची स्किन सतत रिफ्रेश होत राहणार आहे. महत्वाचे म्हणजे, हा फोन Android 4 वर आधारित असून याला One UI 12 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ज्यामध्ये Qualcomm SM7225 Snapdragon 750G 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या फोनला ८ GB रॅम आणि १२८ GB व्हेरिएंट असणार आहे.

कॅमेरा

स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येकजण अनेक फीचर्सचा विचार करतो. मात्र अलीकडच्या काळात खासकरून, इंस्टाग्राम, सोशल मीडियाच्या जमान्यात, कॅमेऱ्याचा जास्त विचार केला जातो. कॅमेऱ्याच्या दृष्टीने हा फोन सर्वोत्कृष्ट असणार आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा f/ १.८ सह १०८ MP आहे. f/२.४ (टेलिफोटो सेन्सर) त्याचबरोबर ८ MP, f/२.२, १२ MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता हा फोन तब्बल १२३˚ पर्यंत करू टिपू शकणार आहे. त्याचबरोबर मायक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जो ५ MP f/२.४ अपर्चरसह मिळणार आहे. जर तुम्ही सेल्फी लवर असाल तर, इथे देखील हा फोन तुमची निराशा करणार नाही. f/२.२ अपर्चर सह ३२ MP कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी

अनेक फीचर्स प्रमाणे, मोबाईलमध्ये कनेक्टिव्हिटीला देखील एक विशेष महत्त्व आहे. मात्र इथे देखील हा फोन तुमचं मन जिंकतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर तुम्हाला, Bluetooth v5.0, 5G, USB Type-C 2.0, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, ड्युअल-बँड, Wi-Fi डायरेक्ट, हॉटस्पॉट, GPS, NFC आणि रेडिओ अशा कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

जबरदस्त बॅटरी

सॅमसंग फोन नेहमीच बॅटरी बॅकअप साठी चांगला असल्याचा फीडबॅक ग्राहकांकडून नेहमी मिळाला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Li-Ion 5000 mAh एवढी तगडी बॅटरी मिळणार आहे. सोबतच तब्बल 33W फास्ट चार्जिंग देण्यात येणार आहे. त्यामुळे फोन खरेदी करताना जर तुम्ही मोठा बॅटरीचा विचार करत असाल तर, हा फोन तुम्हाला नक्की आवडणार आहे. हा फोन विविध रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

हे देखील वाचा Xiaomi च्या ‘या’ दोन फोनमुळे सगळ्याच स्मार्टफोनचा उठलाय बाजार; भन्नाट फिचर्स आणि किंमत जाणून हा फोन तुम्हाला घ्यावाच लागेल

Maharashtra Budget 2022:अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार

रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर इम्रान हाश्मी स्टाईल कीस; व्हिडिओ व्हायरल….

गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; ‘या’ कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किंमती गगनाला भिडणार…

या’ धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसं लुटतंय, वाचा सविस्तर…

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.