रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर ‘इम्रान हाश्मी’ स्टाईल किस; व्हिडिओ व्हायरल

0

तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडणं, आणि प्रेमात पडल्यानंतर व्यक्त होणं हे काही नवीन नाही. प्रेमीयुगल एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांना मिठी मारणं, गालावरती किस करणं, यात आता विशेष असं काही नाही. मात्र पब्लिक प्लॅटफॉर्मवर प्रेमी युगुलांमध्ये ‘इम्रान हाश्मी’ स्टाईल किस करताना आपण सहसा पाहत नाही. मात्र ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन’वर चक्क लोकांसमोर इम्रान हाश्मी स्टाईल किस करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर अनेकजन एकमेकांचे फोटो पोस्ट करत असतो. इंस्टाग्राममुळे हे प्रमाण अधिक झाल्याचे देखील जाणवतं. यात तरुण-तरुणींचा प्रेमयुगलांचा जास्त प्रमाणात सहभाग आढळतो. काही कपल्स रिल्स म्हणून, अनेक रोमॅंटिक व्हिडिओ देखील शूट करताना आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल. सोशल मीडियावर प्रॅक व्हिडिओ, देखील आपण अनेक वेळा पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी पब्लिक प्लॅटफॉर्मवर लोकांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला इम्रान हाश्मी स्टाईल किस करताना सोशल मीडियावर कधी पाहिलंय का? नाही ना, पण या प्रेमी युगुलांनी हा कारनामा करून दाखवला आहे.

दोन कपल्स एकमेकांचा किस करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनवर हे दोघें एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडाले, की यांना आपण काय करतोय, यांचंही भान राहिले नाही. हे दोघे एकमेकाचा किस करताना एकमेकांत एवढे बुडाले, की, आपल्या आसपास अनेक लोकं आपल्याला पाहत आहेत, याचा विसर देखील या दोघांना पडला. आणि हे दोघे आपल्याच धुंदीत एन्जॉय करताना पाहायला मिळाले. दोघांचा किस करतानाचा हा व्हिडीओ, सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला असून, यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे “मध्य रेल्वेच्या डोंबिवलीच्या स्टेशनवर आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ या दोन स्टेशनवर आपल्या प्रेमाचा झेंडा गाडताना दिसले. या दोघांचा किस करतानाचा व्हिडिओ उपस्थित व्यक्तीने कॅमेरात कैद केला. अनेक जण या व्हिडिओत या दोघांन, काही लाज लज्जा, शरम आहे की नाही, असं बोलताना पाहायला मिळतंय. मात्र प्रवाशांचा एकही शब्द या दोघांच्याही कानावर पडताना पाहायला मिळत नाही. आणि ही दोघेही आपल्याच धुंदीत असल्याचं दिसून येत आहे.

https://m.facebook.com/faruk.rollwala.7/videos/968087910492967/?locale2=en_US

किस करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा डोंबिवली स्टेशनवरचा आहे. मात्र यापूर्वी हे दोघे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर देखील कीस करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्या ठिकाणचा व्हिडिओ समोर आला नाही. आम्ही या दोघांच्या शेजारी असूनही, हे दोघे एकमेकांचा किस करत करत होते. आम्ही जवळच असण्याचा यांना काही फरक पडत नव्हता. याउलट आम्हालाच लाज वाटत होती. ते दोघेही त्यांच्या धुंदीत घाणेरडे कृत्य करत होते. असं त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

डोंबिवलीच्या रेल्वे पोलीस अधिकारी, अनिल शेळके यांनी माध्यमांना माहिती दिली. शेळके म्हणाले, “आम्ही व्हिडिओ पाहाच आहोत, पब्लिक जागेवर असं करणं चुकीचं आहे. या संधार्बत आम्ही, एनसी नोंदवून घेतली आहे. या संधार्बत आम्ही अधिक तपास करत आहोत, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली नाही. असंही शेळके यांनी माध्यमांना सांगितले.

हे देखील वाचा. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर पुन्हा वाढतील का? वाचा सविस्तर

कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर..

‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..

बर्ड फ्लू’ बरोबरच ‘या’ कारणांमुळेड्यांचे दर ढासळले; जाणून घ्या कसे ठरतात अंड्यांचे दर..

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा धुमाकूळ; swift WagonR सह या गाड्यांवर पन्नास हजारापर्यंत सूट! वाचा सविस्तर..

Skin Care: उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल? तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती..

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण…

Flipkart’चा धमाका! Samsung redmi सह अनेक ‘स्मार्टफोन’वर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.