WhatsApp चे हे नवीन फीचर तुमच्या आहे खूप फायद्याचे, यामुळे तुमचे काम होणार सोपं

0

Whatsapp: मार्च 2020 मध्ये कोरोना संसर्ग वाढल्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम या पद्धतीने आपले कामकाज चालवले आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आपल्या कार्यालयीन कामकाजासाठी व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपची (WhatsApp) उपयुक्ततादेखील नाकारता येऊ शकत नाही. आता याच पार्श्वभूमीवर एक नवीन फीचर WhatsApp आणणार आहे.(Whatsapp web will work without phone or internet connection)

व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) या नवीन फिचरच्या मदतीने यूजर्स मोबाईल व्यतिरिक्त कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि विंडोज टॅबलेटमध्ये सहजपणे व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरू शकतील. WhatsApp कडून आता लवकरच एक नवीन सुविधा इन्स्टंट मेसेजिंग या अॅपवर उपलब्ध होणार आहे, या नवीन सुविधेच्या मदतीने तुमच्या मोबाईलवर इंटरनेट बंद केल्यानंतर सुध्दा तुम्ही संगणक, लॅपटॉप आणि विंडोज टॅबलेटमध्येही व्हॉट्सअॅपचा आनंद घेऊ शकाल.

सध्या डेस्कटॉप अॅप किंवा व्हॉट्सअॅप वेब वापरण्यासाठी मोबाईल इंटरनेट डाटा चालू ठेवावा लागतो, अन्यथा तुम्हाला डेस्कटॉप, लॅपटॉप आदी मेसेजिंग सेवा वापरता येत नाहीत. प्रायमरी स्मार्टफोनशिवाय डिव्हाइस कनेक्ट करण्याचे  बीटा स्टेजमध्ये आहे आणि सध्या याचे टेस्टिंग चालू आहे. हे WhatsApp वरील Settings मेनूमधील लिंक्ड डिव्हाइसेस पर्यायामध्ये बीटा म्हणून लेबल केलेले एक ऑप्ट-इन फीचर आहे.

 हेही वाचा: तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? तुम्हाला आता समजू शकते.

हे फीचर बंद केल्यानंतर, अॅप सर्व डिव्हाईसेसमधून लॉगआउट होईल, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्वाची भूमिका बजावेल. त्याचसोबत अजून काही नवीन पर्याय देखील असणारा आहे, जे WhatsApp वापरकर्त्यांसाठी फायद्याचे ठरतील. तसेच हे नवीन फीचर कार्यालयीन कामकाजासाठी सुध्दा फायद्याचे ठरेल.

हेही वाचा: WhatsApp आता तुमच्या मोबाईलमध्ये चालणार नाही, जाणून घ्या काय आहे नवीन नियम..

बऱ्याचदा आपला मोबाईलची बॅटरी डाऊन असते किंवा कधी कधी मोबाईल काही कारणाने बंद करावा लागतो. अशा वेळी व्हॉट्सअॅप(WhatsApp) कॉम्पुटर आणि लॅपटॉप काम करणे थांबवते. मात्र WhatsApp च्या या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांची ही गैरसोय होणार नाही. व्हॉट्सॲपचे (WhatsApp) हे नवीन फीचर Android आणि IOS या दोन्हींना सपोर्ट करेल.

WhatsApp अकाउंट मल्टी-डिव्हाईसशी लिंक करता येईल: WhatsApp आता एक नवीन फीचर आणत आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे खाते दुय्यम  डिव्हाईसशी लिंक करण्यास आणि प्राथमिक (ज्यामध्ये तुम्ही मूळ WhatsApp ओपन केले असेल) मोबाईलशिवाय ऑनलाइन संदेश पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास सुरू ठेवण्यास WhatsApp  परवानगी देईल.

अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही आवृत्त्यांवर WhatsApp च्या सर्वात अलीकडील अपडेटमध्ये, हे वैशिष्ट्य अधिकृतपणे सर्व WhatsApp वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे. तुमच्या स्मार्टफोनवर हे नवीन फीचर चालू करत असताना, तुम्हाला स्टिल इन बीटा असे लेबल केलेले वैशिष्ट्य यावर क्लिक करावे लागेल.

एकदा हे वैशिष्ट्य चालू केल्यानंतर, नवीन डिव्हाइसशी पुन्हा लिंक करण्यापूर्वी तुमची सर्व डिव्हाइसेसवरून लिंक रद्द केली जाईल. तुम्ही एकदा लिंक केल्यानंतर, तुमचा मुख्य स्मार्टफोन ज्यामध्ये तुम्ही प्राथमिक WhatsApp चालू आहे तो ऑनलाइन असो किंवा नसो तुम्ही तुमचे काम करू शकता.

WhatsAppचे मेसेज आणि कॉल्स अजून देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत. लिंक केलेले उपकरण मुख्य स्मार्टफोन ऑफलाइन झाल्यानंतर 14 दिवस संदेश प्राप्त करण्यास आणि पाठविण्यास तुम्हाला परवानगी देईल. हे फीचर तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालू करण्यासाठी तुमचे WhatsApp च्या अपडेट करा आणि तीन-बिंदू मेनूवर टॅप करा. त्यानंतर लिंक केलेल्या उपकरणांवर टॅप करा आणि हे फीचर अक्टिवेट करा.

हेही वाचा: Video: अरे वेड्या..,नाच-गाण्यात व्यस्त असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; धनंजय मुंडेंची नवीन धोरणे सपना चौधरीसोबत नाचणे 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात हिंदुस्तानी भाऊ नवाब मलिक यांच्या विरोधात, कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत 

धक्कादायक..! मोहित कंम्बोजच मास्टरमाईंड वानखेडेंना खंडणी गोळा करून देणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश 

Amol Kolhe| अमोल कोल्हे यांच्या पोस्टमुळे उडाली खळबळ, आता घेतायत राजकारणापासून संन्यास 

T20 World Cup: एकीकडे अफगाणिस्तान पराभूत झाला, तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंनी बॅगा भरल्या; अखेर जडेजाच्या तोंडाला यश आलेच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.