T20 World Cup: एकीकडे अफगाणिस्तान पराभूत झाला, तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंनी बॅगा भरल्या; अखेर जडेजाच्या तोंडाला यश आलेच..

0

संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेल्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्थान यांच्यामधील सामन्यात न्‍यूझीलंड संघाने अफगाणिस्तानचा सहज पराभव केला आहे. न्‍यूझीलंड संघाने या विजयाबरोबरच सेमी फायनलमध्येही धडक मारली. मात्र न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये धडक मारली, याच्यापेक्षा जास्त चर्चा क्रिकेट जगतात भारत साखळीतच गारद झाला याची देखील झाली. न्यूझीलंडच्या विजयाबरोबरच भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा आता अधिकृतरित्या संपुष्टात आल्या आहेत. (New Zealand are into the semis)

दुबईमध्ये सुरू असलेल्या टि-ट्वेंटी विश्वचषकाचा चाळीसावा सामना आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्थान यांच्यामध्ये दुपारी साडेतीन वाजता खेळविण्यात आला.(NZvAFG) भारताच्या दृष्टीकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा मानला जात होता. जर न्यूझीलंड संघ या सामन्यात पराभूत झाला, तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार असल्याने या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र न्‍यूझीलंड संघाने अफगाणिस्थानवर मात करत भारताच्या करोडो चाहत्यांच्या आशेवर विरजण टाकत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

अफगाणिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानने घेतलेला निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवत, या सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण केली. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत, अफगाणिस्थान संघाला अवघ्या १२४ धावांवर रोखले. ट्रेन बोल्टने पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ१७ धावा देत, अफगाणिस्तानच्या प्रमुख तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं.

अफगाणिस्तान संघाकडून, मधल्या फळीतला डावखुरा फलंदाज ‘नजीबुल्ला झद्रान’ याने एकाकी किल्ला लढवला. मात्र त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. नजीबुल्ला झद्रान याने काही तंत्रशुद्ध फटके मारत,४८चेंडूत७३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. आणि नजीबुल्ला झद्रानच्या जीवावर अफगानिस्थान कसाबसा २० षटकात १२४ धावांपर्यंत पोहोचला. १२५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या न्‍यूझीलंड संघाने हे आव्हान दोन विकेटच्या मोबदल्यात ११चेंडू शिल्लक असताना सहज पूर्ण केले.

दोन दिवसापूर्वी भारत आणि स्कॉटलांड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर, पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजाला पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता, जर अफगाणिस्थानने न्यूझीलंडला पराभूत केले नाही, तर तुम्ही काय करणार? या प्रश्नाचे उत्तर देताना रवींद्र जडेजा म्हणाला होता, तर आम्ही बॅगा भरणार,आणि थेट घरी येणार. रवींद्र जडेजा म्हणाला, त्याच प्रमाणे आज घडले असून, आता भारतीय संघाला बॅगा भरून घरी येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.