तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? तुम्हाला आता समजू शकते.

0

 

Whatsapp च्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स असतात. कित्येक यूझर्सना या ट्रिक्स माहिती नसतात. यातीलच एक ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

सर्वसामान्य माणसाच्या हातातील बाहुले बनलेले म्हणजे व्हॉटसअप. जगातील सर्वात मोठे, वापरायला देखील सर्वात सोपे, लोकप्रिय असे मेसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सॲप. दिवसभरातील प्रत्येक गोष्टीत आपल्याला व्हॉटसऐपचा वापर होत असतो. केवळ टेक्स्ट मेसेजच नाही, तर एकमेकांना फोटो-व्हिडिओ पाठवणे, ऑडिओ, डॉक्युमेंट्स पाठवणे अशा कामासाठी व्हॉट्सॲपचा वापर होत असतो.

व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल करण्यासाठी आणि पैसेही पाठवण्यासाठी सुद्धा व्हॉट्सॲपचा वापर होत असतो. यासोबतच आपल्या वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेळोवेळी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या फीचर्सव्यतिरिक्तही व्हॉट्सॲपच्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स असतात परंतु त्या वापरकर्त्यांना माहीत देखील नसतात. यातीलच एक ट्रिक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला देखील कधी कधी असा प्रश्न पडत असेल की, तुमचा पार्टनर व्हॉट्सॲपवर कोणाशी जास्त प्रमाणामध्ये गप्पा मारत असतो? आम्ही आज जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, त्या ट्रिकच्या मदतीने तुमचा पार्टनर व्हॉट्सॲपवर कोणाशी सगळ्यात जास्त चॅटिंग करतो हे तुम्हाला कळू शकणार आहे . सोबतच, तुम्ही किती टेक्स मेसेज पाठवले आणि रिसिव्ह केले हेदेखील तुम्हाला समजेल. तसेच, त्यांनी शेअर केलेल्या मीडिया फाईल्सबाबतही तुम्हाला माहिती मिळू शकते (WhatsApp shared files).

त्याचसोबत, खास बाब म्हणजे कोणत्या कॉन्टॅक्ट सोबत झालेलं चॅटिंगमुळे तुमच्या फोनच्या स्टोरेजमधील अधिक जागा घेतली गेली आहे हेदेखील तुम्ही या ट्रिकचां वापर करून समजू शकता.

ही ट्रिक कशी वापराल?

सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप सुरू करा.

यानंतर व्हॉटसअप मधील सेटिंग्ज (Settings) टॅब उघडा.

यामध्ये डेटा अँड स्टोरेज (Data and Storage) या पर्यायावर ( Option) क्लिक करा.

यामध्ये स्टोरेज यूसेज (Storage Usage) पर्यायावर क्लिक करा.

यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट आणि चॅटची यादी दिसेल.

या यादीमध्ये सगळ्यात जास्त स्टोरेज वापरणारं कॉन्टॅक्ट तुम्हाला सर्वात वरती दिसून येईल.

या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास तुम्हाला शेअर केलेल्या चॅटिंगची आणि मीडिया फाईल्सची माहिती भेटेल.

यातून मग तुम्हाला तुम्ही किंवा तुमचा जोडीदार कोणाशी सर्वाधिक बोलत असतो, कोणासोबत तुम्ही सर्वाधिक फोटो, व्हिडिओ, ऑडिओ व फाईल्स शेअर करता या गोष्टीची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल. तसेच, तुमच्या पार्टनरच्या फोनमध्ये ही ट्रिक जर तुम्ही वापरली, तर तुमचा पार्टनर कोणासोबत सर्वाधिक बोलत असतो, चॅट करत असतो किंवा मीडिया शेअर करत आहे. हेदेखील पाहायला मिळेल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.