धक्कादायक..! मोहित कंम्बोजच ‘मास्टरमाईंड’; वानखेडेंना खंडणी गोळा करून देणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश

0

काल झालेल्या पत्रकार परिषदेत, मोहित कंम्बोजने सुनील पाटील हा आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाइंड असून, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप करत अनेक धक्कादायक खुलासेही केले. मोहित कंम्बोजने केलेल्या गंभीर आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी देखील पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी सुनील पाटील हा फ्रॉड माणूस आहे, तो समीर वानखेडे (Sameer wankhede)यांच्या प्रायव्हेट आर्मीचा सदस्य आहे. मात्र आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड हा माणूस मोहित कंम्बोज असल्याचा धक्कादायक खुलासा केला.

नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत आर्यन खान ड्रग्स(Aryan Khan Drug case) प्रकरणाचा सगळा लेखाजोखा मांडताना आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात पद्धतशीर अडकवलं असल्याचं सांगितलं. आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा यांचा खंडणी गोळा करण्याचा उद्देश होता मोहित कंम्बोज याने समीर वानखेडे सोबत मिळून या प्रकरणाचा संपूर्ण कट रचला, असंही सांगितलं. एवढंच नाही तर आर्यन खानकडे कार्टिलिया क्रुझमध्ये होणाऱ्या पार्टीचे तिकिटही नव्हतं. असाही धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केला.

मोहित कंम्बोज याच्या मेव्हण्या मार्फत प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला या दोघांनी आर्यन खानला कार्टिलिया क्रुजवर आणले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा मोहित कंम्बोज आहे. याच्या सांगण्यावरूनच हे सगळं घडलं. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांना सांगून हे घडवण्यात आलं असल्याचा धक्कादायक खुलासा देखील नवाब मलिक यांनी केला. हा कट रचनेचा एकच उद्देश होता, तो म्हणजे ड्रग्स प्रकरणात अडकवून पैसे वसूल कराण्याचा.

मोहित कंम्बोज (Mohit Kamboj) देशाची दिशाभूल करत आहेत, सुनिल पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा एक सदस्य आहे. तो फ्रॉड आहे, या प्रकरणात त्याचा सहभाग आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र या प्रकरणाचा तो मास्टरमाइंड नाही, या प्रकरणाचा मास्टरमाईंड मोहित कंम्बोज आहे. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, मी आयुष्यात त्याला एकदाही भेटलेलो नाही. मोहित कंम्बोज दिशाभूल करण्यासाठी, असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचा, आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

मुंबईच्या एनसीबी जोनल कार्यालयात, समीर वानखेडे मार्फत चांडाळ चौकडी सुरू आहे. या चांडाळ चौकडीत समिर वानखेडे,व्ही व्ही सिंग, अशिश रंजन आणि समिर वानखेडेंचा ड्रायवर माने या सगळ्यांचा ड्रग्जच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर या लोकांची एक प्रायव्हेट आर्मी आहे. मनिष भानुशाली,मोहित कंम्बोज,किरण गोसावी, सॅम डिसूझा, सुनिल पाटील,प्रतिक गाभा, अमर फर्निचरवाला अशी खूप मोठी लिस्ट समीर वानखेडे यांच्या प्रायवेट आर्मीचे आहे, या संदर्भात मी लवकरच आपल्याला सांगेन असाही खुलासा नवाब मलिक यांनी केला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.