Video: अरे वेड्या..,नाच-गाण्यात व्यस्त असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; धनंजय मुंडेंची नवीन धोरणे सपना चौधरीसोबत नाचणे

0

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी काल परळीत दिवाळी निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात हरियाणाची प्रसिद्ध डांसर सपना चौधरीचा ‘डांस’शो ठेवला होता. यावरूनच विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून,आता या डान्सची देखील चर्चा सोशल मीडियावर होताना पाहायला मिळत आहे.

राज्य परिवहन मंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी, राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 35 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना देखील समोर आल्या आहेत. नुकतेच नगरमध्ये सरकारी हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ११ दुर्दैवी मृत्यू देखील झाले. राज्यातला शेतकरी अवकाळी पावसामुळे हतबल होऊन आत्महत्या करतोय. एकीकडे हे सगळं होत असताना, दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्री मात्र आपलं सामाजिक भान हरवून बसलेत. असा घणाघात धनंजय मुंडेंवर विनायक मेटे यांनी काल केला होता.

राज्यात अनेकांचे प्रश्न आ वासून उभे आहेत. एसटी कर्मचारी आपली दिवाळी साजरी करू शकला नाही. हीच परिस्थिती शेतकऱ्यांचीही झाली आहे. एवढे सगळे संवेदनशील विषय समोर असताना राज्य सरकार मधला सामाजिक न्याय मंत्री ‘नाचगाणं’ करण्यात व्यस्त आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, असा घणाघात विनायक मेटे यांनी काल केला होता. धनंजय मुंडे यांच्यावर विनायक मेटे यांनी जोरदार टीका केल्यानंतर आज सदाभाऊ खोत आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी देखील या नाचगाण्यावरून मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी देखील धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर सपना चौधरीच्या नाचगाण्या वरून टीका केली आहे. बीडमध्ये सपना चौधरीच्या नाचण्याने बीडकर त्यांचे सर्व दुःख विसरून गेलेत, आता सरकारने नवीन धोरणे सुरू केली आहेत. “सरकारची नवीन धोरणे, जगण्यासाठी सपना चौधरी बरोबर नाचणे” असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या धनंजय मुंडेंचा या कार्यक्रवरुन समाचार घेतला.

काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे बीजेपीला महाराष्ट्राच्या मातीत गाडू असं म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचं, हे वाक्य लक्षात आणून देताना म्हटले, अरे वेड्या चार-सहा खासदार येणाऱ्या पार्टीने आम्हाला गाडण्याची भाषा करू नये, महाराष्ट्रभर अनेक प्रश्न आहेत. एकीकडे एसटी कर्मचारी आंदोलन करतोय, शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. आणी हे नाचगाणं करण्यात व्यस्त आहेत. अशा माणसांनी आम्हाला शिकवू नये. असा टोला देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis)यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.