आर्यन खान ड्रग्स प्रकरणात हिंदुस्तानी भाऊ नवाब मलिक यांच्या विरोधात, कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत
गेल्या महिनाभरापासून आर्यन खान ‘ड्र’ग्स प्रकरण चांगलेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे. गणपती रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आलेले आहे. नवाब मलिक आर्यन खान ‘ड्र’ग्स प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. आता भाजपा युवा अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यावर देखील नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत.
मोहित कंबोज हेच आर्यन खान ‘ड्र’ग्स प्रकरणातील वसुली मास्टर माईंड असून त्यांनीच आर्यन खान याचे अपहरण केले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनीदेखील नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक वैफल्यग्रस्त झाले आहेत असा टोला त्यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे. कंबोज यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा हिंदुस्तानी भाऊ मैदानात उतरले आहेत.
हिंदुस्थानी भाऊने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदुस्तानी भाऊने मोहित कंबोज यांचे समर्थन केले आहे. “मोहित कंबोज तुम्ही जे नशेडी गांजेडी लोकांविरोधात आंदोलन उभे केले आहे, तुम्ही जे या लोकांविरोधात पाऊल उचलले आहे त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही कधीही हाक द्या मी तुमच्यासोबत असेल”, असे हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाला आहे.
हिंदुस्तानी भाऊ हे आपल्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊचे अनेक चाहते आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये हिंदुस्तानी भाऊची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. हिंदुस्तानी भाऊ देशातील किंवा देशाबाहेरील वेगवेगळ्या मुद्द्यांवर बेधडकपणे आपले मत व्यक्त करत असतात. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉस मध्ये देखील चांगलाच चमकला होता.
हिंदुस्तानी भाऊ हा मूळचा मुंबईचा आहे. त्याचे नाव विकास जयराम पाठक असे आहे. भाऊ त्याच्या आईसह, पत्नी व मुलगा यांच्यासोबत मुंबई येथे राहतो. लहानपणी आपण लोकांचे शिल्लक राहिलेले उष्टे अन्न घेऊन घरी आणून खायचो असे हिंदुस्तानी भाऊने सांगितले होते. विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ एक क्राईम रिपोर्टर म्हणून सुध्दा नावाजलेला आहे. त्याला या क्षेत्रात पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा –धक्कादायक..! मोहित कंम्बोजच मास्टरमाईंड वानखेडेंना खंडणी गोळा करून देणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम