The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं तेव्हा, तिची झालेली केविलवाणी अवस्था..

0

काजल पाटील, पुणे प्रतिनिधी: The story of a helpless woman:समाज हा नेहमी पुरूषांपेक्षा जास्त जबाबदार ‘स्त्री’लाच धरत असल्यामुळे स्त्रीच्या आयुष्यात अधिक संघर्ष असातो. हे स्त्री देखील मान्य करूनच जगत असते. विशेष म्हणजे तिचा नवरा बेजबाबदारपणे वागत असेल तर स्त्रीला अजून बरंच काही सहन करावं लागत. नवरा जर दारुडा असेल तर, तिच्या जीवनातला संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. याची अनेक उदाहरणे आपण आसपास पाहतोच.

असंच एकदा पुण्याहून अहमदनगरला एसटीने प्रवास करत असताना, दारुड्या नवऱ्याच्या वागणुकीला कंटाळून हतबल झाल्याची ‘स्त्री’ मी एसटीत पाहिली. दारुड्या सोबत संसार थाटणं किती अवघड असतं, हे मी त्यादिवशी प्रत्यक्षात अनुभवलं. आज मी तो किस्सा आपल्याशी शेअर करणार आहे. आवडला तर नक्की शेअर करा.

मी नेहमीप्रमाणे काही कारणास्तव पुण्याहून अहमदनगरला निघाले होते. पुढे गेल्यानंतर काही अंतरावर बसमध्ये काही लोक बसले. बस चालू झाली, ३ ते ४ किमी गेल्यावर बस चालकाने जोरात ब्रेक दाबल्यामुळे बस जागीच थांबली.  बसमधील उभे असलेले सगळे लोकं पुढच्या दिशेने झुकले. कारण तोल संभाळण्यापलीकडे गेला होता. चालकाने ब्रेकच तेवढ्या जोरात दाबला होता.

माझ्या बाबतीत देखील तसेच झाले. माझ्या जवळ एक वयोवृद्ध व्यक्ती उभी होती. ती वयोवृद्ध असल्याने मी माझी जागा त्या व्यक्तीला देऊन मी उभी राहिले. त्यामुळे मी देखील पुढच्या दिशेने झुकले. मला देखील माझा तोल सांभाळता आला नाही. त्यामध्ये एक दारु पिलेला व्यक्ती एकदम लोकांच्या अंगावर पडला त्यामुळे लोक वैतागले. त्याला पाठीमागे आहे तीथं जाऊन बसण्यास सांगण्यात आले. परंतु तो पाठीमागे जात असताना महिलांना धक्का लागला.

एरवी एखाद्या चांगल्या माणसाचा धक्का लागला तर, लोक समजून घेतीलही मात्र, एका दारुड्याचा धक्का म्हणजे सहन न होणारी गोष्ट असते. दारुड्याचा त्या महिलेला धक्का लागल्यामुळे अनेक जण त्याला खाली उतरावा म्हणू लागले. सगळे लोक खाली उतरावा म्हणत असल्याने कंडक्टर देखील काही बोलला नाही. तो देखील त्या निर्दयी लोकांच्यातच सामील झाला. त्या संपुर्ण एसटीमध्ये त्याच्या मदतीला कोणीही धावायला तयार नव्हतं. तो एकटा असता तर गोष्ट वेगळी होती, मात्र त्याच्यासोबत त्याची हतबल झालेली पत्नी आणि कडेवर असणारी दोन लेकरंही होती.

तरीसुद्धा त्या महिलेची कोणालाही दया आली नाही, हे पाहून डोळ्यात पाणी आले. हतबल झालेल्या त्या महिलेचं वाईट तर वाटत होतं, मात्र त्याहून अधिक वाईट मला हा समाज किती निर्दयी झाला आहे, याचं वाटतं होतं. ठीक आहे एका दारुड्याचा सगळ्यांना त्रास होत होता. मात्र असा कोणता त्रास होत होता, ज्यामुळे एका महिलेला तिच्याकडेवर दोन लेकर असतानाही तिला आणि तिच्या नवऱ्याला बाहेर काढण्यात या मंडळींना कसलीही शरम वाटत नाही.

त्या दारुड्याला खाली उतरवण्यासाठी एसटी चालक पुढे सरसावला, आपल्याला भर रस्त्यात उतरवणार या भीतीने त्या महिलेने विनवणी चालू केली,”अहो नका ना उतरवू आम्हाला. आम्हाला पुढे जायचं आहे. मी भाऊबीजेला माहेरी चालली आहे. त्या स्त्रीच वाक्य पूर्ण होतंय की नाही, तोपर्यंत माझ्या डोळ्यातून पाणी टपकलं. आता माझी सहनशीलता संपली होती, मी पटकण पुढे आले, न राहून मी त्या कंडक्टरला सुनावलं, माणूस म्हणून तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, आज जे तुम्ही करताय ते बरोबर आहे का?

कंडक्टरच्या ही चूक लक्षात आली होती, माणूस म्हणून या कृत्याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही, हे त्याला चांगलंच उमगलं होतं. माझ्या गळ्यात असणारे महाराष्ट्र लोकशाहीचे ओळखपत्र  पाहिलं आणि तो दचकला. मी विचार केला असता तर त्याची खूप मोठी ब्रेकिंग मला करता आली असती. प्रवास करता करता एक उत्तम ब्रेकिंग मी आमच्या संपादकांना दिलीही असती, मात्र माझ्या त्या ब्रेकिंगने त्या महिलेला काय मिळणार होतं? एसटीत प्रवास करत असणाऱ्या कठोर समाजाचं प्रदर्शन करून मला काय मिळणार होतं? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती.

समाजाचा एक भाग म्हणून मी देखील त्या दिवशी पराभूत झाले होते. मी पत्रकार आहे समजल्यानंतर एसटीत प्रवास करणाऱ्या एकाही माणसाचं तोंड उलगडलं नाही. त्या महिलेला बसण्यासाठी अनेक जण जागा देण्यासाठी पुढे सरसावले. ती ‘स्त्री’ आपल्या दोन लेकरांना घेऊन बाकावर बसली. सामान्य माणूस समाजात कमकुवत असेल तर, त्याची किती पिळवणूक होऊ शकते? आयुष्य जगत असताना त्याला किती अडचणींचा सामना करावा लागतो? मी त्यादिवशी प्रत्यक्षात अनुभवलं.

आयुष्यात एखाद्या महिलेला सन्मानाने वागवायला येत नसेल तर, माणूस म्हणून जगण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. याची एकीकडे मला जाणीव होत होती. मात्र त्याचवेळी, दुसरीकडे हा समाज देखील किती निर्दयी आहे याचे देखील दर्शन होत होतं.

लग्नाअगोदर त्या ‘स्त्री’ने नको नको ती स्वप्ने रंगवली असतील, मात्र लग्नानंतर तिच्या पदरात हे कुठल्या जन्माचं पाप पडलं होतं. याचा विचार देखील तीच्या मनात येत नसेल, एवढं दुःखच तिच्या डोक्यावर येऊन बसलं होतं तर. याच समाजाच्या भीतीने ती आपल्या संसाराचा मोडका तोडका गाडा हाकत पुढे चालवत होती. माझ्यामुळे ती एसटीत बसली होती, असं तिला वाटल्याने तिने मला हात जोडले आणि रडू लागली. मात्र या गोष्टीचं कौतुक वाटावं, की शरम वाटावी. हा विचार मी तुमच्यावर सोपवून देते.

हेही वाचा- Aryan Khan Drug case: पहिला बॉम्ब फुटला! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं उघड 

Sameer wankhede: समीर वानखेडेंचा वाईट काळ सुरू; आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह या महत्वपूर्ण सहा चौकशातून हकालपट्टी 

T20 World Cup: आम्ही असंच खेळत राहिलो तर कोणाचा बापही आम्हाला पराभूत करू शकत नाही; विराट कोहलीचा सहकारी कडाडला

Video: अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले नाही तर तुम्ही काय कराल?,जडेजा गेला चक्रावून दिले हे उत्तर 

Video: हे वेस्ट इंडीजवाले पण ना काय करतील याचा काय नेम नाही! विकेट घेतल्यानंतर थेट बॅट्समनच्याच उरावर जाऊन बसला ख्रिस गेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.