Amol Kolhe| अमोल कोल्हे यांच्या पोस्टमुळे उडाली खळबळ, आता घेतायत राजकारणापासून संन्यास

0

अभिनयातून राजकारणाकडे वाटचाल केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर विधानसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित फेरविचार करण्याचा सुध्दा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांचा अशा प्रकारच्या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही सिंहावलोकनाची वेळ आहे. गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांत आणि वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय देखील घेतले. काही अनपेक्षित पावलं सुध्दा उचलली गेली. पण, हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. तो थोडा शारीरिक, बराचसा मानसिक आहे.

शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; परंतु मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं, थोडं मनन आणि थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारसुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय… काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!! या फेसबुक पोस्टवर त्यांनी टीपही लिहिली असून फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमोल कोल्हे हे मूळचे शिवसैनिक परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम करत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीकडून शिरूर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले. त्यांनी शिरूर लोकसभा मतदासंघाचे तीन वेळा नेतृत्व केलेले शिवसेना पक्षाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून विजयी होण्याचा मान मिळवला होता.

अमोल कोल्हे यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी नव्हती. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांनी आढळराव पाटील यांच्या विरोधात बाजी मारली. अमोल कोल्हे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. सुवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी राज्यात राष्ट्रवादीचा पक्षाचा आवाज सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्यांना निवडण्यात आले होते.

डॉ. अमोलकोल्हे यांच्या आक्रमक भाषण शैलीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा झाला होता. परंतु कोरोना महामारीच्या काळात मतदारसंघामध्ये फिरकत नसल्यामुळे अमोल कोल्हे यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. विशेष म्हणजे त्यांच्या शुटींगवरून त्यांच्यावर विरोधक टीका करताना पाहायला मिळत होते. कदाचित राजकारण आणि अभिनय या दोन्ही क्षेत्राला वेळ देत असताना कोल्हे यांची धावपळ होत होत असावी, असे त्यांच्या फेसबुक पोस्टवरून वाटते. त्यामुळेच त्यांनी चिंतन आणि सिंहावलोकन करण्याचे बोलले असावे.

हेही वाचा-धक्कादायक..! मोहित कंम्बोजच मास्टरमाईंड वानखेडेंना खंडणी गोळा करून देणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश 

Nawab Malik: बिजेपीचा बॉम्ब निघाला फुसका! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील निघाला बीजेपीचा मोहरा 

Video: हे वेस्ट इंडीजवाले पण ना काय करतील याचा काय नेम नाही! विकेट घेतल्यानंतर थेट बॅट्समनच्याच उरावर जाऊन बसला ख्रिस गेल 

Aryan Khan Drug case: पहिला बॉम्ब फुटला! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं उघड 

The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं तेव्हा, तिची झालेली केविलवाणी अवस्था..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.