WhatsApp आता तुमच्या मोबाईलमध्ये चालणार नाही, जाणून घ्या काय आहे नवीन नियम..

0

मुंबई| तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅपचे (WhatsApp  New Version) वापरकर्ते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लवकरच जुन्या मोबाइल हँडसेटमधून WhatsApp बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण आता WhatsApp मध्ये एक महत्त्वाचे अपडेट केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या नवीन अपडेटमुळे काही मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जुन्या Android आणि iOS डिव्हाइला सपोर्ट करणार नाही म्हणजेच चालणार नाही. यामधील नवीन आणि बदललेले नवीन सुरक्षा फीचर्स जुने (WhatsApp  Update News) मोबाईल हँडसेट वापरणाऱ्या लोकांना आपोआप लॉग आउट करतील. Whatsapp ही कंपनी फेसबुकच्या मालकीची आहे.

Whatsapp चे मालकी हक्क फेसबूक कंपनीकडे आहेत. या नवीन अपडेट बाबत माहिती देत असताना WhatsApp ने हा निर्णय घेण्यामागचे कारण सांगितले आहे. WhatsApp च्या मते, गोपनीयता व सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला असल्याचे whatsapp ने म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून हे अ‍ॅप Android आणि iOS च्या जुन्या व्हर्जनमध्ये सपोर्ट करणार नाही.

WhatsApp च्या नव्या निर्णयानुसार Android OS 4.1 आणि iOS 10 आणि त्यापेक्षा वरच्या पातळीवरील स्मार्टफोन वापरणारे वापरकर्ते WhatsApp चा वापर करू शकतील. त्याचबरोबर Jio फोन आणि Jio Phone 2 सह KaiOS 2.5.0 किंवा त्यापेक्षा अधिकच्या श्रेणीतील मोबाईलमध्ये WhatsApp वापरता येऊ शकते.  KaiOS 2.5.0 3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 या सिस्टीम असलेल्या मोबाईल फोनमध्ये तुम्ही WhatsApp वापरू शकणार नाही.

तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ओएस स्टेटस सेटिंग मेनूमध्ये बघून नोव्हेंबर २०२१ पासून तुम्ही तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकाल का नाही? हे पाहता येईल. जर तुमचा फोन वरीलपैकी अपडेटेड व्हर्जनपैकी नसेल तर तुम्हाला WhatsApp वापरण्यासाठी नवीन फोन घ्यावा लागेल. बऱ्याच देशांनी सुरक्षेबाबत WhatsApp कंपनीला इशारा दिलेला आहे.

अनेक देशांनी WhatsApp ला इशारा दिल्यानंतर WhatsApp ने आता सुरक्षा फीचर मजबूत करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. या नव्या फीचर्समुळे सुरक्षेचा प्रश्न सोडवला जाणार आहे. WhatsApp ला केंद्राकडून देखील इशारा देण्यात आला होता. चीनसारख्या देशाने WhatsApp वापरावर  बंदी घातलेली आहे.

महत्वाच्या बातम्या-T20 World Cup 2021 : पाकड्यांकडून भारतीय संघ चारीमुंड्या चीत; नको असणारा विक्रम झाला नावावर 

आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का  

इंटरनेट नसेल तरीदेखील तुम्ही वापरू शकता WhatsApp वाचा कसे..

राष्ट्रवादीच्या या नेत्याचं नाव घेतल्यास माझ्या तोंडाचा घाण वास येईल;उदयनराजे यांची जहरी टीका 

धक्कादायक| आर्थिक परिस्थितीला कंटाळुन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.