T20 World Cup 2021 : पाकड्यांकडून भारतीय संघ चारीमुंड्या चीत; नको असणारा विक्रम झाला नावावर
T20 World Cup 2021: गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान विश्वचषकामधील टी-ट्वेण्टी (T20 World Cup 2021) सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भारतीय संघ पाकिस्तान संघाकडून वर्ल्डकपमध्ये एकदाही पराभूत झाला नसल्याने विराट कोहलीचा संघ पुन्हा एकदा पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करेल असं वाटत होतं. मात्र आज खेळविण्यात आलेल्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर पाकड्यांनी भारतालाच चारीमुंड्या चित करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. (India vs Pakistan T20 World Cup 2021 Results: Indian team charitable An unwanted record was set)
पाकिस्तानच्या ‘कॅप्टन’ बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बाबर आजमने घेतलेला निर्णय सार्थ ठरवत, भारतीय सलामवीरांना आलेल्या वाटेने लगेच माघारी तंबूत धाडले. पाकिस्तानचा लेफ्ट आर्म स्पेसर गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या भारताच्या दोन्ही सलामवीरांना आपल्या जाळ्यात अडकवले. ३ बाद ३१ अशी भारताची दयनीय अवस्था झाल्यानंतर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश ठरला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने एकेरी झुंज देत सर्वाधिक ५७ धावांची दमदार खेळी केली.
४९ चेंडूत ५७ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला विकेट किपर रिषभ पंतने ३० चेंडूत ३९ धावा करत चांगली साथ दिली. मात्र भारताच्या इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्यामुळे भारताला २०षटकात १५१ धावांपर्यंत मजल मारता आली. १५२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी हा सामना एकतर्फी करून टाकला.
कॅप्टन बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान या दोन्ही सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशा हवा काढली. भारताच्या एकाही गोलंदाजांना पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. पाकिस्तान संघाने हा सामना १० विकेट आणि १३ चेंडू शिल्लक असताना सहज आपल्या खिशात घातला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कुठेही वाटला नाही हा सामना जिंकेल.
𝐖𝐇𝐀𝐓. 𝐀. 𝐏𝐄𝐑𝐅𝐎𝐑𝐌𝐀𝐍𝐂𝐄 🔥#T20WorldCup | #INDvPAK | https://t.co/74tB9RjNUH pic.twitter.com/DHagg9XqtN
— ICC (@ICC) October 24, 2021
वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये पाकिस्तानने कधीही भारताचा पराभव केला नव्हता. मात्र पराभवाची ही परंपरा पाकिस्तानने खंडित करत,एक नवा इतिहास रचला आहे. वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पराभूत होण्याची नामुष्की विराट कोहलीच्या संघावर आली असल्याने,भारतीय संघावर क्रिकेट चाहते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना आता 31 तारखेला न्यूझीलंड विरूद्ध याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या- आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का
Tata समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल
राष्ट्रवादीच्या या नेत्याचं नाव घेतल्यास माझ्या तोंडाचा घाण वास येईल;उदयनराजे यांची जहरी टीका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम