राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं नाव घेतल्यास माझ्या तोंडाचा घाण वास येईल;उदयनराजे यांची जहरी टीका

0

साताराचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारामध्ये असणाऱ्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलावरून तत्कालीन पालकमंत्री यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तत्कालीन पालकमंत्र्यांवर टीका करत असताना त्यांनी नाव घेणं टाळले, मात्र त्यांचा रोष अजित पवारांकडे असल्याचं बोललं जातंय.

गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे विरोधकांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उदयनराजे विविध विकास कामांचे उद्घाटन करत आहेत. छत्रपती शाहू क्रीडा संकुलावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावल्याचे पाहायला मिळत आहे. शाहू क्रीडा संकुलावरून टिका करत असताना त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही,मात्र ते अजित पवारांविषयीच बोलत होते हे या प्रकरणावरून लक्षात येत.

शाहू क्रीडा संकुल उभारताना कुठल्याही प्रकारचे नियोजन केलं नाही. या स्टेडियमचं सगळं वाटोळं केलं आहे. क्रीडा संकुल उभारण्याच्या पूर्वी या ठिकाणी रणजी सामने व्हायचे. मात्र हे स्टेडियम चुकीच्या पद्धतीने उभारल्यामुळे या ठिकाणी रणजी सामने देखील होत नाही. असा घणाघात उदयनराजे यांनी या स्टेडियमचे उद्घाटन करणाऱ्या तत्कालीन पालकमंत्र्यांवर केला आहे.

साताऱ्याला पार झिरो करायचं ठरवलंय या लोकांनी. या स्टेडियमचे वाटोळं करणाऱ्यांचं मुस्काट फोडले पाहिजे. असाही घनाघात उदयनराजे यांनी अप्रत्यक्ष अजित पवारांवर केला आहे. आपण टेंडर क्रीडा संकुलाचे काढलं होतं, व्यापार संकुलाचं नाही.‌ असा सवालही , उदयनराजे राजे उपस्थित करत केला आहे.

‘टेंडर’ क्रीडा संकुलाचं काढून व्यापार संकुलाप्रमाणे बाहेरून गाळे काढण्याचा अजब कारभार संबंधित पालकमंत्र्यांनी केला आहे. असल्या गलथान कारभारामुळे मला त्यांचे नाव देखील घ्यायची इच्छा नाही. त्यांचं नाव घेतल्यावर माझ्या तोंडून घाण वास येईल,असाही घणाघात उदनराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.

हेही वाचा- सर्वसामान्यांचा खर्च वाढणार, एसटीचा प्रवास महागणार, पेट्रोल, डिझेल नंतर आता तिकितदर वाढणार 

ChatSim: इंटरनेट नसेल तरीदेखील तुम्ही वापरू शकता WhatsApp वाचा कसे.. 

सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवलेले संचालक सुनिल भगत यांचा राजकीय प्रवास..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.