ChatSim: इंटरनेट नसेल तरीदेखील तुम्ही वापरू शकता WhatsApp वाचा कसे..
सध्याच्या काळामध्ये इंटरनेटचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्व वाढत चालले आहे. क्षणात बरीच कामे इंटरनेटमुळे होत असतात. जर मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टफोन, इंटरनेट या गोष्टी आपल्यापासून काही दिवस लांब ठेवल्या तर कितीतरी लोकांना गुदमरत आपलं जीवन जगत असल्याचा भास होईल. कारण आता या गोष्टी आपल्या सवय नाही तर व्यसन बनल्या आहेत. (ChatSim: How To Read WhatsApp You Can Use Even Without Internet ..)
इंटरनेटमुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी एका क्षणात जाणून घेऊ शकता. घरी बसून कुठलीही फिल्म पाहू शकता. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्याची आवड असते. ते वेगवेगळ्या प्रकारची माहिती, चित्रपट इंटरनेटचा वापर करून पहात असतात. आजकाल स्मार्टफोन वापरकर्त्यांचे प्रमाण देखील वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आजकाल बऱ्याच लोकांनी स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली आहे.
स्मार्टफोन वापरकर्ते अनेक लोक फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (WhatsApp) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. त्यामध्ये व्हॉट्सॲप हे खूप लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतात 90 टक्क्यापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरकर्ते WhatsApp चा वापर करत असतात. बऱ्याच बरेच वापरकर्त्यांना हे माहीत नाही की, इंटरनेट नसेल तर व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरता येते. जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीसुद्धा तुम्ही WhatsApp वापरू शकता.
बऱ्याचदा लोकांना वाटते की, इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल तर मग फोटो किंवा व्हिडिओ कसा पाठवायचा? तर यासाठी एक पद्धत आहे ती वापरून तुम्ही इंटरनेट नसताना सुद्धा फोटो, व्हिडिओ पाठवू शकता. आज आपण इंटरनेट नसताना सुद्धा कसे व्हॉट्सॲप वापरायचे हे जाणून घेऊया.
इंटरनेटशिवाय तुम्हाला व्हॉट्सॲप (How can we use whatsapp without internet?) वापरायचे असेल तर तुम्हाला एक विशेष सिमकार्ड विकत घ्यावं लागेल. “चॅटसिम” (ChatSim) नावाचं हे सिमकार्ड तुम्हाला यासाठी घ्यावं लागेल. तुम्ही हे सिमकार्ड ई कॉमर्स वेबसाईटवरून विकत घेऊ शकता. तुम्हाला हे सिमकार्ड (ChatSim) चॅटसिमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन देखील मिळवता येईल.
CHATSIM तुम्हाला 1800 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 1800 रुपयांमध्ये तुम्हाला 1 वर्षांचा रिचार्ज मिळेल. तुम्ही हे सिमकार्ड 1 वर्ष वापरू शकाल. 1 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रिचार्ज करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही इंटरनेटशिवाय व्हॉट्सॲप, फेसबूक, टेलिग्राम, वीचॅट हे ॲप्लिकेशन वापरू शकाल. प्रत्येक वर्षी तुम्ही रीन्यूवल करणे आवश्यक आहे.
ChatSim चे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही मोबाईल फोनमध्ये इंस्टॉल केले जाते. हे सिममर्ड आपल्या देशात किंवा परदेशात सर्वत्र वापरू शकता. तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम हे ॲप वापरू शकता. तुम्ही व्हॉट्सॲपवर सतत सक्रिय राहू शकता.
हेही वाचा – बापरे! कोरोनाचे थैमान वाढले, या देशात पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, पुन्हा लोकडाऊनची घोषणा
धक्कादायक! न्यायाधीशानेच केला ब’ला’त्कार, कोर्टाने बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात ठरवले दोषी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम