बापरे! कोरोनाचे थैमान वाढले, या देशात पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, पुन्हा लोकडाऊनची घोषणा

Corona Vaccination ची गरज

0

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता रशिया खूपच त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक आठवडा लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. रशियातील सर्व कामगार वर्गाला एक आठवडा पगारी सुट्ट्या मिळणार आहेत. लोकांनासुध्दा आपल्या घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Corona Vaccination: Infection is very high in the country due to low vaccination rates)

रशियातील  संसर्ग थांबवण्यासाठी 28 ऑक्टोबरला राजधानी मॉस्को येथे एका आठवड्याचा राष्ट्रीय लॉकडाऊन घोषित केला गेला आहे.मॉस्को शहराचे महापौर सेर्गेई सोब्यानिन हे म्हणाले की, सर्व दुकाने, बार आणि हॉटेल्स हे संपूर्णपणे बंद राहतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केलेल्या घोषणेनंतर मॉस्कोमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. केवळ सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांना उघडे ठेवण्याची परवानगी मिळेल.

रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नॉन वर्किंग विकचा प्रस्ताव दिला आहे. बुधवारी, रशियामध्ये 24 तासांमध्ये कारोनामुळे  1,028 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रसार चालू झाला तेव्हापासूनचा हा मृत्यूंचा एका दिवसातील हा सर्वाधिक मोठा आकडा आहे.आत्तापर्यंत रशियामध्ये साथीच्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची एकूण संख्या 226,353 झाली आहे, जी युरोपमधील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

यामुळेच पुतिन सरकारच्या मंत्रिमंडळाने असे सूचित केले आले होते की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एक आठवड्याची सुट्टी जाहीर केली जाऊ शकते. राष्ट्रपती पुतिन यांनी बुधवारी सांगितले होते की, ते 30 ऑक्टोबर रोजी नॉन वर्किंग विक सुरू करण्याच्या आणि पुढील आठवड्यापर्यंत मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत. 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या  पहिल्या 7 दिवसांपैकी पहिले 4 दिवस सरकारी सुट्ट्या आहेत.

राष्ट्रपती पुतीन यांनी असे आदेश दिले की,  30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात रशियामध्ये लॉकडाऊन असेल. त्यांनी जर प्रादेशिक नेत्यांना सांगितले आहे की, जर त्यांना असे वाटत असेल की अजून काही कठोर उपाययोजना लागू केले पाहिजेत तर ते तशा सूचना देऊ शकतात. पुतीन म्हणाले की, काही भागामध्ये ज्या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, त्यांचा नॉन वर्किंग कालावधी शनिवारपासून चालू होऊ शकतो.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.