धक्कादायक! न्यायाधीशानेच केला ब’ला’त्कार, कोर्टाने ब’ला’त्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात ठरवले दोषी
जम्मू-काश्मीरमध्ये न्यायाधीशानेच ब’ला’त्कार आणि फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. जम्मू काश्मिर फास्ट ट्रॅक कोर्टात एक न्यायाधीश ब’ला’त्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत. त्याच्यावर ब’ला’त्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास ४ वर्षे झाले ते निलंबित होते .
इतर गुन्हेगांराना त्यांच्या चुकीची शिक्षा देणारा न्यायमुर्ती स्वतःच एका ब’ला’त्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी ठरला आहे. जम्मू -काश्मीरमधील फास्ट ट्रॅक कोर्टाकडून घेतलेल्या सुनावणीत उपन्यायाधीशांवरील गुन्हे सिद्ध झालेले आहेत. कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये उपन्यायाधीश दोषी ठरले आहेत. जम्मूतील एका महिलेवर ब’ला’त्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप उपन्यायाधीशावर होता.
पिडीत महिलेने 2018 मध्ये नराधम उप न्यायाधीशाकडून कायदेशीर मदत मागितली होती. उपन्यायाधीशावर केलेल्या आरोपानंतर तत्काळ निलंबित करण्यात आले. यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की आरोपी विरोधात सादर केलेले पुरावे त्यातून आरोपी बद्दलल सत्यता सिद्ध झाली आहे .त्यामुळे आरोपीला कलम 420 आणि 376 (2) (के) आरपीसी अंतर्गत ब’ला’त्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी दोषी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
तरीसुद्धा आतापर्यंत, न्यायालयाकडून आरोपीला शिक्षा केलेली नाही. आज शनिवारी न्यायालयात या आरोपीच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, प्रभावशाली व्यक्तीने आपली पोहोच, प्रभाव आणि अधिकार लक्षात घेऊन सर्वसामान्यांप्रती अधिक काळजीपुर्वक जबाबदार आणि संवेदनशील असायला हवे. त्यांनी अनुभव आणि ज्ञानाने प्राधिकरण आणि कायद्याचा अर्थ जाणून घेणे आणि समजून घेणे अपेक्षित आहे
तक्रारदार पिडीत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रामबन येथील रहिवासी आहे. जेव्हा ती एक केस लढत होती तेव्हा ती न्यायाधिशांना भेटली. उपन्यायाधीश असल्याने अब्रोलने कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले आणि पिडितेला घरातील कामात मदत करण्यास सांगितले. यानंतर ती महिला न्यायाधीशांच्या घरी काम करू लागली. न्यायाधीशांनी महिलेला तिच्या मुलीला चांगले शिक्षण देण्याचे आश्वासन देऊन एक प्रकारचे आमिष दाखवले .
आरोपी उपन्यायाधिशाने दरमहा 5000 रुपये पगार ही देऊ असे पिडितेला सांगितले होते. पिडीत महिलेच्या खचलेल्या मानसिक आणि आर्थिक स्थितीचा फायदा घेत त्याने महिलेला आपल्या बोलण्याने फसवून महिलेवर बला’त्का’र केला. न्यायदेवतेच्या मंदिरात न्याय देणारा ब’ला’त्कार करायला लागल्यावर न्याय नावाची गोष्ट उरेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा-टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार
बापरे! कोरोनाचे थैमान वाढले, या देशात पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, पुन्हा लोकडाऊनची घोषणा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम