आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का

0

2 ऑक्टोंबर पासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कार्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणावरून एनसीबीच्या ताब्यात आहे. सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. दोन वेळा न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता आर्यन खानच्या वकीलने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या अर्जावर मंगळवारी २६ तारखेला सुनावणी होणार आहे. मात्र आता या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतल्याचे पाहिला मिळत आहे.

आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणावरून एनसीबीसीच्या भूमिकेविषयी नेहमीच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आर्यन खानच्या कॉलरला, हाताला पकडून एनसीबीच्या ऑफिसला नेणारा व्यक्ती हा NCB चा एक अधिकारीच असल्याचं, सुरुवातीला सगळ्यांनाच वाटले होते. मात्र तपासात तो ‘किरण गोसावी’ असून तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यानंतर ‘किरण गोसावी’चा या प्रकरणाशी काय संबंध? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

एवढंच नाही तर, दीड लाख, दोन लाख असे अनेक फसवणुकीचे गुन्हे असणाऱ्या किरण गोसावी याने आर्यन खान सोबतचा, एक एनसीबीच्या ऑफिसमध्ये सेल्फी काढून, सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र या नंतर हा किरण गोसावी अचानकपणे गायब झाला. हा नेमका कुठे गेला? याचा तपास अद्याप लागलेला नाही.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणाचा तपास करत असणारा ‘समीर वानखेडे’ फेक माणूस असून, गेल्या वर्षी त्याने मालदीवमध्ये अनेक बॉलीवूड स्टार मंडळीकडून खंडणी घेतल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून या प्रकरणात कुठे तरी पाल चुकचुकते असल्याचे अनेकांनी म्हटलं होतं. मात्र आता किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड ‘प्रभाकर साईल’ यानेच या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा करत सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.

किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड ‘प्रभाकर साईल’ याने वकिलामार्फत एक एफिडेविट’ सादर करताना या प्रकरणाचा सगळा घटनाक्रम मांडला आहे. एनसीबीच्या कार्डिलीया क्रूझवरील ड्रग्स कारवाई दरम्यान एनसीबीचे अधिकारी,मी,किरण गोसावी आणि मनिष भानुशाली उपस्थित होतो. विशेष म्हणजे त्याने किरण गोसावी हा ‘सॅम डिसूझा’ या व्यक्तीला छापेमारी होण्यापूर्वी एनसीबी कार्यालयाच्या बाहेर भेटला होता. असाही धक्कादायक खुलासा प्रभाकर साईल यांनी आपल्या ‘एफिडेविट’मध्ये केला आहे.

किरण गोसावी यांनी मला ‘गुगल पे’वर पाचशे रुपये पाठवले,सोबत लोकेशनही पाठवलं. आणि या लोकेशनवर मला येण्यासाठी सांगितलं. मी लोकेशनवर गेलो तर,ते एनसीबीचं कार्यालय असल्याचं समजलं. तिथं गेल्यावर किरण गोसावी आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांची मिंटींग सुरु असल्याचं मला समजलं. २ आक्टोंबरला सकाळी पावणे दहाच्या सुमारास मिटींग संपवून किरण गोसावी बाहेर पडले, त्यांच्या पाठीमागे समीर वानखेडे, हे देखील आपल्या सरकारी गाडीने गेले.

काही वेळा नंतर मला देखील ‘ग्रीन गेट’मधून कार्डिलिया क्रुझमध्ये घेऊन गेले. त्यावेळी मी पहिल्यांदा पाहिले,त्यावर ‘इंटरनॅशनल टर्मिनस क्रुझ’ असं लिहीलं होतं. या क्रूजमध्ये ट्रग्स सापडले की नाही? हे मला माहिती नाही. मात्र मला क्रुजच्या एका गेटवर थांबवलं होतं. आणि माझ्या व्हाट्सअपवर काही फोटो पाठवले होते. यामध्ये मला असं सांगण्यात आलं होतं की, या फोटो मधील कोणीही व्यक्ती क्रूजमध्ये येताना पाहिली तर,आम्हाला इन्फॉर्म कर. असाही मोठा खुलासा प्रभाकर साहिल यांनी केला आहे.

या क्रुझमधून एकूण १३ लोकांना ट्रग्स प्रकरणात पकडल्याचा मला संध्याकाळी ४:३०ला मेसेज आल्याचे प्रभाकर साईलने एका मिडिया वेबसाईटशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे या ड्रग्स प्रकरणाचा पंचनामा कार्डिलिया  क्रुझवर न होता, एनसीबीच्या ऑफिसला पंचनामा केल्याचा धक्कादायक खुलासा देखील ‘प्रभाकर साईल’ यांनी केला आहे.

पंचनाम्यावर सह्या करण्यासाठी मला रात्री पावणे एक वाजता एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलं. माझ्याकडून नऊ ते दहा कोऱ्या कागदावर जबारदस्तीने सह्या करून घेतल्या. मी कोऱ्या कागदावर सह्या करत नव्हतो, मात्र समीर वानखेडे आले आणि म्हणाले, “ऐ कर रे सह्या काही नाही होत”. किरण गोसावी यांनीही मला सह्या करायला सांगितले, नंतर मी सह्या केल्या. असंही ‘प्रभाकर साईल’ यांनी आपल्या ‘एफिडेविट’मध्ये म्हटले आहे.

एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खानला एका कोपर्‍यात बसवले होते. त्याच्याजवळ किरण गोसावी हे देखील बसले होते. आणि आपल्या स्वतःच्या फोनवरून आर्यन खानला कोणाशी तरी बोलायला लावत असल्याचे एका व्हिडिओत दिसून येत आहे. या प्रकरणाचा गोसावी पंच आहे, त्यामुळे एनसीबीच्या कार्यालयात आहे, इथपर्यंत ठीक आहे. मात्र तो स्वता:च्या फोनवरून आर्यन खानला कोणाशी तरी बोलायला लावत आहे, हा सारा प्रकार एनसीबी कार्यालयात होत असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भातला व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

‘प्रभाकर साईल’ याने या प्रकरणाचा खळबळ उडवून देणारा खुलासा केला आहे. २५ कोटींचा बॉब टाकला आहे. १८ कोटींपर्यंत डिल करून टाकू. यातले ८ कोटी आपल्याला समीर वानखेडे यांनाही द्यावे लागतील. अशी चर्चा गोसावी आणि ‘सॅम डिसूझा’ यांच्यामध्ये झाल्याचे प्रभाकर साईल याने वकिलामार्फत दाखल केलेल्या एफिडेविटमध्ये म्हटले आहे.

शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसै घेण्यासंदर्भात ‘सॅम डिसूझा’ आणि ‘किरण गोसावी’ या दोघांमध्ये चर्चा होत होती. मात्र ती फोन उचलत नव्हती. असाही खळबळजनक खुलासा प्रभाकर साईल याने केला आहे.

प्रभाकर साहिल यांनी केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर आता एनसीबीने देखील यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. ‘अशोक जैन’ या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, प्रभाकर साहिल यांनी जे काही म्हटलं, ते आता कोर्टासमोर आहे. समीर वानखेडे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले असले तरी, त्यांना क्लीन चिट दिलेली नाही. या संदर्भातील चौकशी करण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे हे प्रकरण सोपवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – शाहरुखच्या या व्हायरल फोटोमागचं सत्य झाले उघड, फोटो सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल

हे दोन पनौती मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्यानेच भारताचा पराभव; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Tata समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हा

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं नाव घेतल्यास माझ्या तोंडाचा घाण वास येईल;उदयनराजे यांची जहरी टीका

धक्कादायक| आर्थिक परिस्थितीला कंटाळुन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.