धक्कादायक| आर्थिक परिस्थितीला कंटाळुन अल्पवयीन मुलीची आत्महत्या

0

आपल्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हलाखीची असून माझ्या शिक्षणासाठी माझ्या आई-वडिलांकडे पैसेही नाहीत. त्यांना माझे कोणत्याही प्रकारचे ओझे व्हायला नको म्हणुन मी माझे जीवन संपवत आहे असं चिठ्ठीमध्ये लिहून  एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने आपलं जीवन संपवले आहे. हसायचा खेळायच्या वयात या मुलीने हे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील छिदवाडी येथे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. कुटुंबाच्या गरिबीला थकून १७ वर्षीच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या सारखे चुकीचं पाऊल टाकुन स्वतःच जीवन संपवुन टाकले आहे . घरातील परिस्थिती अत्यंत हालाखीची असून माझ्या शिक्षणाच्या खर्चासाठी माझ्या आई-वडिलांकडे पैसेही नाहीत, त्यांना ओझं नको म्हणून मी हे जीवन संपवत आहे .असे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

या अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी 20 तारखेला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचे नाव सेजल गोपाल जाधव असं आहे. एवढ्याशा वयात आत्महत्येसारख चुकीच पाऊल उचलले गेले आहे. त्यामुळे गावात  हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यु पूर्वी तिने चिठ्ठीत तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या घरी तीन एकर शेती आहे.

शेतमजुरीतून मिळणारी मजूरी आणि शेतातून मिळणारे थोडेसे आर्थिक उत्त्पन यातूनच घरातील खर्च भागतो. त्याच उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सलग  तीन वर्षांपासून होत असलेली शेताची नापिकी, पिकाची नासधूस, अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे होणारे नुकसान त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालवलेली. त्यामूळे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होत होता. त्यात आम्ही दोन बहिणी, एक लहान भाऊ अशा  सर्वांच्या पोटाचा प्रश्न बिकट होत आहे.

आम्हा सर्व बहीण भावंडांचे शिक्षण, हे सर्व करत असताना आई-वडिलांना फार कष्ट सोसावे लागत आहेत. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. हे चिठ्ठित  लिहिलेलं आढळून आले आहे.  सेजलने आपल्या राहत्या  घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. राहायला थोडी जागा, कामाला जाणारी एकटी आई घरावर कर्ज होते. सेजलच्या शिक्षणासाठी तिच्या बहिणीने शाळा सोडली होती.

त्यामूळे सेजलच्या मनात कायम आपल्या बहिणीच्या शिक्षणाबाबत सल टोचत होती. त्याचसोबत पास नापास होण्याची भीती. आपल्या परिस्थितीला वैतागून डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे सेजलने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. यावेळी चिठ्ठीत तिने मी स्वतः माझे आयुष्य संपवत आहे . माझ्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे .कुऱ्हा पोलीस पुढील तपास पहात आहेत.

हेही वाचा- आठ कोटी साठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का 

Tata समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल 

राष्ट्रवादीच्या या नेत्याचं नाव घेतल्यास माझ्या तोंडाचा घाण वास येईल;उदयनराजे यांची जहरी टीका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.