AUS vs IND 3rd ODI: भारत तिसऱ्या वनडेत उतरवणार World Cup 2023 चा संघ; जाणून घ्या playing 11..

0

AUS vs IND 3rd ODI: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यामध्ये उद्या तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना राजकोटच्या (Rajkot) मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (kuldeep Yadav) परतल्याने, भारतीय संघात बदल होणार आहेत. विश्वचषकामध्ये खेळणारे अकरा खेळाडू घेऊनच भारतीय संघ उद्याच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. (IND vs AUS 3rd ODI live streaming)

पहिल्या दोन्ही सामन्यांच्या स्टार खेळाडूंना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळणार नाही. उद्याच्या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, आणि कुलदीप यादवची थेट एंट्री भारतीय संघात होणार आहे. दोन्हीं डावात दमदार खेळ साकारणाऱ्या शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिल शिवाय उद्या भारताकडून मैदानात उतरणारे सर्व खेळाडू हेच विश्वचषक 2023 मध्ये भारताच्या अंतिम 11 मध्ये खेळताना दिसतील.

आशिया चषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ विश्वचषकामध्ये फेवरेट असल्याचं कोणीही मानायला तयार नव्हतं. त्याला अनेक वास्तविक कारणे देखील होती. केएल राहुल (kl Rahul) आणि श्रेयस अय्यर (shreyas Iyer) दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग गेल्या अनेक महिन्यांपासून नव्हते. दुखापतीनंतर ते कशी कामगिरी करतात? याविषयी देखील प्रश्नचिन्ह होते. या दोघां व्यतिरिक्त भारतीय संघाने मधल्या क्रमांकाचे खेळाडू तयार केले नव्हते.

त्यामुळे भारतीय मिडल ऑर्डर काय असेल? हे कोणीही सांगू शकत नव्हते. साहजिक अशा अनेक समस्या असल्याने भारतीय संघ विश्वचषक 2023 मध्ये फेवरेट मानला जात नव्हता. मात्र आता आशिया चषक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाच्या सर्चच फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे आता भारतीय संघ अधिक बलशाली आणि धोकादायक मानला जात आहे.

आठव्या क्रमांकावर एका अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता म्हणून, भारतीय टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पसंती देत होता. मात्र आता भारतीय संघाने हा विचार बदलला असून, आता एक प्रॉपर जलदगती गोलंदाजासह भारतीय संघ मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.

स्पिन गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी असेल तर त्या मैदानावर रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात येणार आहे. चार प्रॉपर गोलंदाज, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या हे कॉम्बिनेशन घेऊन भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात शुभमन गिलला विश्रांती देण्यात आल्याने त्याच्या जागेवर ईशान किशन कॅप्टन रोहित शर्मासोबत सलामीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अशी ड्रीम इलेव्हन घेऊन भारतीय संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणि वर्ल्ड कपमध्ये देखील उतरणार आहे.

हे देखील वाचा IND vs AUS 3rd ODI: तिसऱ्या वनडेत होणार सात बदल; जाणून घ्या कोण-कोण बसणार बाहेर..

Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

India playing 11 World Cup 2023: संघ झालाय दमदार, पण द्रविड, रोहितची ती चूक पडणार महागात; World Cup ही जाणार हातून..

Shreyas Iyer: सूर्या, ईशान की श्रेयस कोणाला मिळणार संधी? अखेर झालं स्पष्ट; असा असेल world Cup 2023 चा भारतीय संघ..

peanut chikki recipe: तुम्ही देखील खाता बाहेरची शेंगदाणा चक्की? शेंगदाणा चक्की बनवण्याची पद्धत पाहून पुन्हा तुम्ही हातही लावणार नाही..

IND vs AUS: थाटात जिंकलो, पण त्या नव्या पेचाने रोहित शर्मा, राहुल द्रविडची झोप उडवली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.