IND vs AUS 3rd ODI: तिसऱ्या वनडेत होणार सात बदल; जाणून घ्या कोण-कोण बसणार बाहेर..
IND vs AUS 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्याचा मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या राजकोट मैदानावर खेळवला जाणार आहे. इंदोर खेळपट्टी प्रमाणे, राजकोटची खेळपट्टी देखील फलंदाजासाठी अनुकूल आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना यापेक्षा जास्त उत्सुकता भारताच्या प्लेइंग 11 विषयी आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचे स्टार खेळाडू परतणार आहेत. विराट कोहली (Virat kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहेत. त्यामुळे आता अखेरच्या वनडेमध्ये संघात तब्बल सात बदल होणार आहेत. जाणून घेऊया उद्या भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणारे सात बदल.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात विराट कोहली, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) जसप्रीत बुमराह (Jaspreet bumrah) भारताच्या अंतिम 11 संघाचा भाग नव्हते. आता मात्र तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हे सर्व खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे आता भारताच्या प्लेइंग 11 मधून अनेक खेळाडूंना बाहेर बसावं लागणार आहे.
भारताचे सर्वच खेळाडू आता जबरदस्त फॉर्ममध्ये आले आहेत. वर्ल्डकपसाठी अंतिम 11 मध्ये कोणाला संधी द्यायची? ही मोठी डोखेदुःखी कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) समोर आहे. मात्र ही एक चांगली डोकेदुखी असल्याने, अनेकांची चिंता दूर झाली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वर्ल्ड कप (World Cup squad) स्कॉड मैदानात उतरणार आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलला (shubhman gill) विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शुभमन गिलच्या जागेवर सलामीवीर म्हणून ईशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात येईल. ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर (shardul Thakur) रविचंद्रन अश्विन (ravichandran Ashwin) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे सहा खेळाडू तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचा भाग नसणार आहेत.
उद्या क्रिकेट चाहत्यांना भारताच्या वर्ल्ड कप संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याची देखील झलक पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, उद्या सामन्याची सुरुवात करतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. चौथ्या क्रमांकावर श्रेयश अय्यरला (shreyas Iyer) संधी दिली जाणार आहे.
पाचव्या क्रमांकावर केएल राहुल (KL Rahul) सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या ?Hardik Pandya) सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) असणार आहे. गोलंदाजीची कमान कुलदीप यादव (Kuldeep Yadav) जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आणि मोहम्मद सिराज असा गोलंदाज अटॅक घेऊन भारत मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम