Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..

0

Aacharya Chanakya quotes: जीवनामध्ये (life) प्रत्येकाला आनंद (happy) सकारात्मक राहायचं असतं. मात्र कामाच्या व्यापामुळे, तणावामुळे प्रत्येकाला हे शक्य होत नाही. निरोगी आरोग्यासाठी आनंदी जीवन फार आवश्यक आहे. जर तुम्ही सकारात्मक आणि आनंदी नसाल, तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही नेहमी आनंदी आणि सकारात्मक रहात असाल, तर जीवनात येणाऱ्या अडचणी तुम्ही चुटकी सरशीत सोडवू शकता. आणि तुमचे ध्येय प्राप्त देखील सहजरित्या करू शकता.

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथामधून त्यांनी जीवनासंबंधी अनेक उपदेश केले आहेत. माणसाने आनंदी आणि सकारात्मक कसे राहायचे? याविषयी देखील त्यांनी भाष्य केले आहे. मनुष्याच्या आयुष्यात चढउतार हे येत राहतात. मात्र त्याचा धैर्याने सामना करणे तीतकेच आवश्यक असते. तरच तुम्ही आनंदी राहू शकाल, असं चाणक्य सांगतात. जाणून घेऊया चाणक्याने सांगितलेली तीन मूलमंत्र.

आचार्य चाणक्य म्हणतात, समाधानामध्ये आनंद दडलेला असतो. जो मनुष्य असमाधानी असतो. अशा मनुष्याने जीवनात काहीही मिळवले, तरी देखील तो आनंदी राहू शकत नाही. आनंदी राहण्यासाठी तुमच्याकडे समाधान असावं लागतं. माणसाच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत. चाणक्य म्हणतात, अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. मात्र महत्त्वकांक्षी मनुष्य आनंदी आणि सकारात्मक जीवन जगू शकत नाही.

अलीकडच्या काळात प्रत्येकाला आरोग्याच्या समस्या अधिक जास्त प्रमाणात जाणवतात. त्याचे कारण म्हणजे, धावपळीच्या या जमान्यात आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणालाही फारसा वेळ नाही. लाईफस्टाईल आणि पोषक आहार देखील वेळेवर मिळत नसल्याने, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आणि म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, ज्या मनुष्याचे आरोग्य उत्तम नाही, असा मनुष्य कधीही आनंदी राहू शकत नाही. निरोगी आरोग्य मानवाकडे असणारं सर्वात मोठं भांडवल असल्याचं चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, ज्या मनुष्यामध्ये अपयशाची भीती असते. तो मनुष्य जीवनात कधीही आनंदी राहू शकत नाही. मनुष्याला स्वतःवर आत्मविश्वास हवा. आत्मविश्वासाच्या जोरावर तो काहीही करू शकतो. ज्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असतो असा मनुष्य अपयशाच्या भीतीने कधीही खचत नाही. आणि आपलं दुःख इतरांजवळ व्यक्तही करत नाही. त्यामुळे मनुष्याने आत्मविश्वास कधीही गमावू नये. तरच तो आनंदी राहू शकतो, असे चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Dhanashree Verma With Siraj: श्रेयस अय्यर नंतर धनश्रीचे मोहम्मद सिराज सोबत अफेअर; त्या व्हायरल फोटोमध्ये झाला खुलासा..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

IND vs WI 2nd T20: या खेळाडूच्या जागी यशस्वीला संधी; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

Jio Recharge plan: 84 दिवस वैधता आणि दररोज 3GB डेटा; जियोने सादर केले तीन भन्नाट रिचार्ज प्लॅन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.