IND vs WI 2nd T20: या खेळाडूच्या जागी यशस्वीला संधी; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

0

IND vs WI 2nd T20: पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यामुळे, भारताला पराभवाचा सामना करावा लागला. (India lost first T20) वेस्टइंडीज संघाने भारता समोर विजयासाठी ठेवलेले 150 धावांचे आव्हान देखील भारतीय फलंदाजाना पेलवले नाही. ठराविक अंतराने भारतीय प्रमुख फलंदाज बाद होत गेल्याने भारतीय संघ केवळ 20 षटकात 144 धावा करू शकला. (India vs West Indies 2nd t20 live)

मुंबई इंडियन्स कडून खेळताना आयपीएल गाजवणाऱ्या तिलक वर्माने (Tilak Varma) पदार्पणातच आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. भारतीय संघाकडून सर्वाधिक 22 चेंडू 39 धावांची झुंजार खेळी केली. तिलक वर्मा व्यतिरिक्त भारताच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही.

पहिल्या T20 सामन्यात भारतीय फलंदाजी अपयशी ठरल्यानंतर, आता यशस्वीला (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या T20 सामन्यात संधी देण्यात येणार आहे. भारतीय टीम मॅनेजमेंट कडून या संदर्भात अधिक स्पष्टता करण्यात आली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वीला अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी संघात स्थान देण्यात येणार आहे. (Akshar Patel replace Yashasvi Jaiswal)

वेस्टइंडीज संघामध्ये खूप सारे डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजासमोर लेप्ट आर्म स्पिनर महागडा ठरतो. वेस्टइंडीज फलंदाजासमोर अक्षर पटेलला चार षटके टाकू देणे म्हणजे, अधिक रिस्क आहे. पहिल्या t20 सामन्यात देखील अक्षर पटेलने केवळ दोन षटके टाकली. ज्यामध्ये त्याने 22 धावा देखील दिल्या. फलंदाजीमध्ये देखील तो अपयशी ठरला.

त्याचबरोबर पहिल्या T20 सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरल्याने, आणखी एका स्पेशालिस्ट फलंदाजाला भारतीय संघात संधी मिळावी या विचारा पाठीमागे भारतीय टीम मॅनेजमेंट देखील असल्याची माहिती आहे. दुसरीकडे यशस्वी जयस्वाल देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल नंतर वेस्टइंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील त्याने दमदार कामगिरी केली. आणि याचाच विचार करता त्याला भारताच्या अंतिम 11 मध्ये संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यशस्वी येणार सलामीला

दुसऱ्या t20 सामन्यात अंतिम 11 मध्ये यशस्वी जयस्वालचा सहभाग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, त्याला शुभमन गिलच्या (Shubman Gill) जागी सलामीला देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आयपीएल नंतर धावा काढण्यासाठी शुभमन गिल धावा काढण्यासाठी झगडताना पहिला मिळतोय. आणि म्हणून शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर तर त्याच्या जागी यशस्वीला सलामीसाठी पाठवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

असा असेल दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

यशस्वी जयस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार) युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

हे देखील वाचा BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Jio Recharge plan: 84 दिवस वैधता आणि दररोज 3GB डेटा; जियोने सादर केले तीन भन्नाट रिचार्ज प्लॅन..

PM Kisan 14th installment: अजूनही 14 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत? केवळ करा हे काम, झटक्यात येतील पैसे..

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.