Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

0

Smartphone Under 15k: अनेकांना बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. मार्केटमध्ये स्मार्टफोनच्या अनेक कंपनी असल्याने, ग्राहकांना स्मार्टफोन निगडीवर अनेक ऑप्शन देखील मिळतात. मात्र तरी देखील अनेकांना कमी किंमतीत कोणते दमदार स्मार्टफोन बाजारात विकले जातात? याविषयी फारशी माहिती मिळत नाही. जर तुम्हाला देखील 15000 पेक्षा कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Samsung Galaxy M14 5G

अनेकांना सॅमसंग या ब्रँडचे स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असते. मात्र या स्मार्टफोनच्या किमती जास्त असल्याने प्रत्येकाला या कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करता येणं शक्य होत नाही. मात्र Samsung चा Samsung Galaxy M14 5G हा स्मार्टफोन तुम्हाला पंधरा हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे. या स्मार्टफोनचे फिचर्स देखील दमदार आहेत.

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला तब्बल 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला गेला आहे. Galaxy M14 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले तब्बल 6.6 इंचाचा आहे. जो FHD+ आहे. स्टोरेज विषयी सांगायचं झाल्यास, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज या स्मार्टफोनला देण्यात आले आहे. ज्याची किंमत केवळ 14 हजार 999 रुपये ठेवली आहे.

Poco M4 5G

15 हजाराच्या आतमध्ये जर तुमचे बजेट असेल तर Poco M4 5G हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. या स्मार्टफोनला देखील दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असणारा हा POCO M4 5G स्मार्टफोन केवळ 12 हजार 999 रुपयांत मिळत आहे. या फोनला 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला असून, याचा डिस्प्ले 6.58-इंच असणार आहे. या फोनची बॅटरी देखील 5,000mAh देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी 18W चार्जर देण्यात आला आहे.

iQOO Z6 Lite 5G

जर तुमचे बजेट पंधरा हजार रुपयांच्या आसपास असेल तर तुमच्यासाठी iQOO Z6 Lite 5G हा फोन देखील बेस्ट आहे. विशेष म्हणजे हा फोन तुम्हाला तब्बल सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह मिळतो. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दमदार देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि 6.58 इंच डिस्प्ले दिला आहे. जो FHD+ असणार आहे. या फोनची किंमत केवळ साडे चौदा हजार ठेवण्यात आली आहे.

Infinix Hot 30 5G

Infinix Hot 30 5G हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ बारा हजार 499 रुपयात खरेदी करण्याची मोठी संधी आहे. Infinix Hot 30 5G हा फोन तुम्हाला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. या फोनचा बॅटरी बॅकअप देखील दमदार आहे. 6,000mAh बॅटरी असून फास्ट चार्जिंगसाठी 18W चा चार्जर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Ishan Kishan ईशान किशनसाठी ती तब्बल चार तास थांबली, अन् अखेर तिने आय लव यू म्हणत प्रपोजही केलं, पाहा तो व्हिडिओ..

Chanakya quotes: पत्नीचा हे दोन अवगुण माणसाला उठवतात समाजातून..

Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.