Chanakya quotes: पत्नीचा हे दोन अवगुण माणसाला उठवतात समाजातून..

0

Chanakya quotes: लग्न (marriage) हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा असतो. खरंतर लग्नानंतर, माणसाच्या नवीन आयुष्याची सुरुवात होत असते. साहजिकच त्यामुळे लग्न करताना प्रत्येक जण अनेक गोष्टीचा विचार करून निर्णय घेत असतो. मुलगा असो की मुलगी आपला वैवाहिक जोडीदार निवडताना बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र तरी देखील अनेकदा फसवणूक होते. आणि सुंदर आणि आनंदी आयुष्य पत्नीच्या काही गुणांमुळे उध्वस्त होतं.

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथा मधून त्यांनी अनेक गोष्टी विषयी भाष्य केलं आहे. वैवाहिक जोडीदार कसा असायला हवा, याविषयी देखील त्यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्याचबरोबर पत्नीचे (wife) कोणते दोन गुण माणसाला उध्वस्त करू शकतात, हे देखील त्यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रंथातून सांगितले आहे.

पत्नी जर समजूतदार प्रेमळ आणि संयमी असेल, तर वैवाहिक आयुष्य स्वर्गाहूनही सुंदर असतं. मात्र पत्नीमध्ये जर हे गुण नसतील, तर मनुष्याला जिवंतपणे नरकाचा यातना सहन कराव्या लागतात. असं नेहमी सांगितलं जातं. जाणून घेऊया, पत्नीचे कोणते दोन गुण मनुष्याला समाजातून उठवतात..

आर्य चाणक्य सांगतात, जी पत्नी सभ्यपणे बोलत नाही, अशी पत्नी कुटुंबासाठी प्रचंड धोकादायक असते. जर पत्नीच्या तोंडून कटू शब्द निघत असतील तर संपूर्ण कुटुंबाची प्रतिमा समाजामध्ये मलिन करण्याची कोणतीही कसर ती ठेवत नाही. समोरच्यांच्या भावनांचा बिलकुलही पर्वा करत नाही. पत्नी असभ्य असेल, तर ती कुटुंबाचा विचार न करता तिला हव्या त्या पद्धतीने आयुष्य जगत असते. त्यामुळे उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य म्हणतात, पत्नीला जर किरकोळ कारणावरून सतत राग येत असेल, तर अशी पत्नी कुटुंबासाठी प्रचंड धोकादायक असते. राग हा येताना ऐकटा येतो, मात्र मनुष्याचे सर्व चांगले गुण सोबत घेऊन जातो. पत्नीला जर राग येत असेल, तर तिला योग्य काय आणि अयोग्य काय? याविषयी काहीही देणं घेणं राहत नाही. अशा व्यक्तींना सांभाळणे म्हणजे समाजातून आपण उध्वस्त होणे, असाच हा प्रकार असतो. त्यामुळे वेळीच अशा व्यक्तींना सोडून देणं, हे कधीही उचित राहतं. असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Chanakya Niti: म्हणून या पुरुषांसाठी महिला काहीही करायला असतात तयार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.