Chanakya Niti: म्हणून या पुरुषांसाठी महिला काहीही करायला असतात तयार..

0

Chanakya Niti: प्रत्येकाला आपल्या मनासारखा जोडीदार (Partner) हवा असतो. पुरुषांच्या (men) तुलनेत महिला (women) आपला जोडीदार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करतात. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथांमध्ये आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी देखील या संदर्भात उल्लेख केला आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अतिशय संवेदनशील आणि परिपक्व असतात. आणि म्हणून जीवनातला जोडीदार निवडीचा मोठा निर्णय त्या खूप विचारपूर्वक करतात. (Chanakya niti quotes)

महिला सहसा आपल्या प्रेमाची कबुली पुरुषांकडे करत नाहीत. मात्र महिला आपला जोडीदार कसा असावा,  याविषयी त्यांनी कल्पना केलेली असते. आचार्य चाणक्य यांनी यासंदर्भात म्हटले आहे, पुरुषांच्या गुणांवर महिला प्रेम करतात. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार महिलांना कशा प्रकारचे पुरुष हवे असतात? जाणून घेऊया सविस्तर..

पुरुषांप्रमाणे महिलांना देखील पुरुषांमध्ये आकर्षण वाटत असतं. ज्या पुरुषांमध्ये प्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो, अशा पुरुषांसाठी महिला काहीही करायला तयार असतात. प्रामाणिकपणा बरोबर पुरुष जर समजूतदार असेल, शांत असेल, याबरोबरच जर तो ऐकून घेणारा असेल, तर अशा पुरुषांना मिळवण्यासाठी महिला पागल असतात.

चाणक्य म्हणतात, महिला आपल्या जीवनसाथीची निवड करताना कधीच सौंदर्याचा विचार करत नाहीत. सौंदर्यापेक्षा महिला पुरुषांच्या मनाकडे अधिक जास्त आकर्षित होतात. ज्या पुरुषाचे व्यक्तिमत्व चांगले असते, पुरुषाची वागणूक चांगली असते, अशा पुरुषांची महिला नेहमी निवड करतात. असं चाणक्य सांगतात.

चाणक्य सांगतात, स्त्रियांना नेहमी प्रचंड मेहनत करणारे पुरुष आवडतात. अशा पुरुषांना निवडण्याचे कारण म्हणजे, स्त्रियांना वाटते आपले भविष्य त्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. मेहनती बरोबर पुरुष चांगला श्रोता म्हणजेच, ऐकून घेणारा असेल, तर त्याची निवड महिला करतात. त्याचे कारण म्हणजे, आपल्या आवडीनिवडीची देखील कदर आपला जोडीदार करेल. आणि याच कारणारमुळे महिला नेहमी ऐकून घेणाऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडत असतात.

ज्या पुरुषांमध्ये ऐकण्याची आणि चांगलं, नम्र, बोलण्याची क्षमता आहे, अशा पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. बोलणारे पुरुष हे धोकेबाज नसतात. असा त्यांचा समज असतो. जे पुरुष डोळ्यात डोळे घालून संवाद साधतात, असे पुरुष खोटे बोलत नाहीत असा त्यांचा समज असतो. ज्या पुरुषांचे शब्द कठोर असतात, त्याचबरोबर जे पुरुष केवळ स्वतः च्या कामात व्यस्त असतात, असे पुरुष महिलांना बिलकुल आवडत नाहीत.

हे देखील वाचा successful Life tips: यश तर मिळणार नाहीच, पण या चार गोष्टींना चुकूनही शिवलात तरी जीवनातून उठाल..

PM Kisan: अजूनही 14 वा हप्ता जमा झाला नाही? मग करा या हेल्पलाईन नंबरवर कॉल..

Partner cheating Tips: तुमचीही गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत चॅट करतेय? ही एक ट्रिक पकडुन देईल रंगेहाथ..

Astrology: ..म्हणून लग्नाच्या अगोदरच हे लोक बनतात प्रचंड श्रीमंत..

PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..

SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.