PM Kisan: अजूनही 14 वा हप्ता जमा झाला नाही? मग करा या हेल्पलाईन नंबरवर कॉल..

0

PM Kisan: गेले काही महिन्यांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी (pantpradhan krushi Samman Yojana) योजनेचे लाभार्थी शेतकरी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत होते. अखेर 27 तारखेला लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून दोन हजार रुपयांचा १४ वा हप्ता जमा केला आला आहे. देशभरातील तब्बल आठ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये रक्कम जमा करण्यात आले. मात्र अजूनही काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा चौदावा हप्ता जमा झाला नाही. (PM Kisan14 Installment)

केंद्र सरकारने डीबीटीच्या (DBT) माध्यमातून तब्बल 17000 कोटी रुपयांची रक्कम देशातील एकूण आठ कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली. शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजारांचे 14 हप्ते देण्यात आले आहेत. 28 हजार रुपयाची राशी देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 2.59 लाख कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाले आहेत. मात्र अजूनही काही शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळाला नाही. जर तुम्हालाही मिळाला नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता. याशिवाय तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तरीदेखील तुम्ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. याविषयी देखील आपण सविस्तर माहिती घेऊ.

तुम्हाला आला का एसएमएस?

केंद्र सरकारने 27 जुलैला पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर 27 जुलैला 14 वा हप्ता जमा केला आहे. जमा राशीचा एसएमएस देखील बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला गेला आहे. तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला 14 हप्त्याचा एसएमएस आला नसेल, तर तुम्ही बँकेत किंवा एटीएममध्ये जाऊन या हप्त्याविषयी माहिती घेऊ शकता. याशिवाय तुम्ही ईमेल आणि टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील तक्रार करू शकता.

या नंबरवर करा कॉल…

लँडलाईन क्रमांक : 011-23382401, 011-23381092,

टोल फ्री क्रमांक 18001155266

अडचण आली असेल तर; 011-24300606

नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606

हेल्पलाईन; 155261, 18001155266

ई-मेलवर देखील तक्रार करू शकता

अजूनही जर पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा झाला नसेल, तर तुम्ही ईमेल द्वारे तक्रार देखील नोंदवू शकता. pmkisan-ict@gov.in या ईमेलवर तुम्ही तक्रार नोंदवा.

अशी तपासा तुमच्या खात्याची स्थिती..

तुमच्या खात्याची स्थिती देखील तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता. यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्याकरिता तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करा.

त्यांनतर ‘Farmers Corner‘ हा पर्याय निवडा. ‘Farmers Corner’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ‘Beneficiary Status’ हा पर्याय पहायला मिळेल. तुम्हाला बरोबर ‘Beneficiary Status‘ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला आधार क्रमांक, बँक खाते नंबर टाकायचा आहे. ही सर्व माहिती सबमिटकेल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेच्या खात्याची सर्व स्थिती पाहायला मिळेल.

हे देखील वाचा Partner cheating Tips: तुमचीही गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत चॅट करतेय? ही एक ट्रिक पकडुन देईल रंगेहाथ..

PM Matru Vandana Yojana: या महिलांना सरकार देतंय 6 हजार; असा घ्या लाभ..

SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

Bhuvneshwar Kumar: या कारणामुळे भुवनेश्वर कुमारला नाईलाजाने घ्यावा लागला निवृत्तीचा निर्णय..

Astrology: ..म्हणून लग्नाच्या अगोदरच हे लोक बनतात प्रचंड श्रीमंत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.