Bhuvneshwar Kumar: या कारणामुळे भुवनेश्वर कुमारला नाईलाजाने घ्यावा लागला निवृत्तीचा निर्णय..

0

Bhuvneshwar Kumar: एकेकाळी आपल्या स्विंगच्या तालावर अनेक दिग्गजांना नाचवणारा भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आता यापुढे भारतीय जर्सीमध्ये क्रिकेट चाहत्यांना खेळताना दिसणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचा भाग नाही. वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय (IND vs WI ODI series) मालिका देखील भुवनेश्वरची निवड करण्यात आली नाही. अनेक नवीन जलदगती गोलंदाज भारतीय संघाकडे असल्याने भुवनेश्वर कुमारकडे निवड समितीने पाठ फिरवली. त्याचाच परिणाम म्हणून भुवनेश्वर कुमारने मोठा निर्णय घेतला आहे.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. खरंतर तेव्हापासूनच भारतीय संघाने भुवनेश्वर कुमारकडे पाठ फिरवली.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये देखील भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली. मात्र तरी देखील निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यावर्षी होणाऱ्या 50 षटकाच्या विश्वचषकासाठी देखील भुवनेश्वर कुमारची निवड भारतीय संघात होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्षदीप सिंग, जसप्रीत बुमराहचे देखील पुनरागमन होणार असल्याचं बोललं जात आहे.

मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह या गोलंदाजांना निवड समिती विश्वचषकच्या संघात निवड करणार असल्याची माहिती मिळाली आहे. साहजिकच त्यामुळे भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघातील स्थान जवळपास संपुष्टात आले आहे.vभारतीय संघात आता पुनरागमन होणार नाही, हे भुवनेश्वर कुमारला देखील समजल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अप्रत्यक्ष निवृत्त जाहीर केली आहे.

भुवनेश्वर कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये (Bhuvneshwar Kumar Instagram bio) मोठा बदल केल्याने निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर कुमार लवकरच अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. भुनेश्वर कुमारने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल करताना इंडियन क्रिकेटर हे स्टेटस काढून टाकले आहे.

भुवनेश्वर कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बयोमध्ये यापूर्वी भारतीय क्रिकेटर हे स्टेटस ठेवलं होतं. मात्र भारतीय क्रिकेटर हे स्टेटस काढून त्याने फक्त भारतीय असाच उल्लेख ठेवला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाकडून खेळण्याची आशा त्याने सोडून दिल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर भुवनेश्वरच्या या अपडेटची जोरदार चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा WI vs IND 1St ODI: ..म्हणून संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला दिली संधी; हे धक्कादायक कारण आले समोर..

Rohit Sharma: ..म्हणून भारत वर्ल्डकप जिंकण्यास लायक नाही; पहिल्याच सामन्यात झाल्या कधीही भरून न निघणाऱ्या या चुका..

Astrology: ..म्हणून लग्नाच्या अगोदरच हे लोक बनतात प्रचंड श्रीमंत..

Google Pixel 7: Google चा हा दमदार स्मार्टफोन केवळ दहा हजारांत विकत घेण्याची संधी; जाणून घ्या ऑफर..

SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.