WI vs IND 1St ODI: ..म्हणून संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला दिली संधी; हे धक्कादायक कारण आले समोर..

0

WI vs IND 1St ODI: आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आगामी विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून भारतीय संघाला प्रथम फलंदाज करण्याची संधी होती. मात्र रोहित शर्मा (rohit sharma) पहिल्याच सामन्यात डिफेन्सिव्ह माईंडसेटने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळालं. (Sanju Samson dropped first odi)

आगामी विश्वचषक (world cup 2023) स्पर्धेची तयारी म्हणून भारतीय संघाची अंतिम अकरा कशी असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र भारतीय कर्णधाराकडून पुन्हा एकदा संघ निवडीत चुका झाल्याचं दिसून आलं आहे. शार्दुल ठाकूर (shardul Thakur) हा वर्ल्डकप स्पर्धेचा भाग नसणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र तरी देखील त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली. समालोचकांनी या निर्णयावर टीका देखील केली आहे.

भारताच्या अंतिम 11 मध्ये ईशान किशन (Ishan Kishan) की संजू सॅमसन (Sanju Samson) या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. ईशान किशन पेक्षा संजूची कामगिरी सरस राहिली आहे. संजू सॅमसनने आतापर्यंत अकरा एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 330 धावा, ज्या 66 च्या सरासरीने केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आठ वर्षात त्याला केवळ 27 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. साहजिकच त्यामुळे ईशान किशनच्या अगोदर संजूला अंतिम अकरामध्ये स्थान देणे आवश्यक होते.

वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला वगळण्याचे कारण आता समोर आलं आहे. भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात एकही डावखुरा फलंदाज नाही. आणि म्हणून चौथ्या क्रमांकासाठी ईशान किशनची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र या निवडी बरोबर भारतीय संघ व्यवस्थापक अनेकदा आपलं मत हव्या त्या पद्धतीने बदलताना दिसत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मॅचअपच्या दृष्टीने खेळाडूंना संधी देण्यात येते. असे यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र काही सामन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी झळकावून देखील ईशान किशनला बाहेर ठेवून शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. तेव्हा मात्र मॅचअपचा विचार करण्यात आला नव्हता. आता पुन्हा एकदा संजूला डावलून मॅचअपचे कारण पुढे करत ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. भेदक मारा करत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी वेस्टइंडीज संघाच्या टॉप ऑर्डरचं कंबर मोडलं आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्टइंडीज संघाने १० षटकात ३ बाद ५२ धावा केल्या आहेत. 

हे देखील वाचा Deer Viral video: ..म्हणून हरणांचा कळप थेट जाऊन बसला माणसांजवळ; पाहा हा भन्नाट व्हिडिओ..

Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..

Smrita Mandhana Palash Muchhal: 27 वर्षाच्या या तरुणासोबत स्मृती मानधनाचं सूत जुळलं; लग्नाची तारीखही ठरली..

Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.