Smrita Mandhana Palash Muchhal: 27 वर्षाच्या या तरुणासोबत स्मृती मानधनाचं सूत जुळलं; लग्नाची तारीखही ठरली..

0

Smrita Mandhana Palash Muchhal: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर डावखुरी फलंदाज स्मृती मानधना (smriti mandhana) सध्या आपल्या रिलेशनशिप विषयी चर्चेत आहे. स्मृती मानधनाने आपल्या खेळाबरोबरच अनेकांना आपल्या सुंदरतेने देखील घायाळ केले आहे. स्मृती मानधना सोशल मीडियावर आपल्या खेळाबरोबरच इतर कारणांमुळे देखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

‘काम चालू है’ या चित्रपटात राजपाल यादव हा प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पलाश मुच्छल (Palash Muchhal) करतो आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल, पलाश मच्छर कोण आहे? तर हा स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड आहे. जो एक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून काम करतो. मात्र दोघांनीही अद्याप आपल्या रिलेशन विषयी अधिकृत घोषणा केली नाही. परंतु हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या वर्षभरापासून हे दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहायला मिळाले आहेत. ‘काम चालू है’ या चित्रपटाचे शूटिंग सध्या सांगलीत सुरू आहे. या चित्रपटाची शूटिंग सांगलीत सुरू असल्यामुळे स्मृती मानधना हिने देखील काम चालू है च्या सेटवर आपली उपस्थिती दर्शवली. राजपाल यादव यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्मृती मानधना आणि तिचा बॉयफ्रेंड देखील पाहायला मिळत आहे.

कोण आहे पलाश मुच्छल?

पलाश मुच्छल हा दिग्दर्शक आणि संगीतकार आहे. तो आपला आगामी ”काम चालू है “हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एका खाजगी कार्यक्रमात स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल (Smrita Mandhana Palash Muchhal) या दोघांची ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मात्र या दोघांनी अध्याप आपल्या रिलेशनशिप विषयी अधिककृत घोषणा केलेली नाही. असं असलं तरी दोघेही एकमेकांच्या घरगुती कार्यक्रमासाठी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवतात.

तिथेही पोहचली होती स्मृती मानधना..

भारतीय महिला क्रिकेट स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने पलाश मुच्छल हिच्या बहिणीच्या हळदी आणि रिसेप्शन पार्टीत देखील आपली उपस्थिती दर्शवली होती. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशिप विषयी चर्चा रंगल्या.

मात्र या दोघांनी आपल्या नात्याचा खुलासा अद्याप केलेला नाही. याशिवाय स्मृती मानधनाचा काही दिवसापूर्वी वाढदिवस झाला. तेव्हा देखील पलाश मुच्छलने अनोख्या अंदाजात स्मृतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

सोशल मीडियावर दोघांच्या नावे इंस्टा पेज…

@Smritipalash18 या नावाने दोघांचे एकत्रित इंस्टाग्राम पेज देखील सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या पेजवर दोघांचे एकत्रित असणारे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यात जिममध्ये एकत्रित व्यायाम करताना फोटो देखील पोस्ट करण्यात आले आहेत. सोबतच डिनर, डेट, वाढदिवस सेलिब्रेशन अशा अनेक प्रेमळ घाकांचा या पेजवर समावेश करण्यात आला आहे.

हे देखील वाचा IND vs WI 1st Odi: अशी आहे पहिल्या वनडेसाठी भारताची अंतिम अकरा; जाणून घ्या सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण..

Cash Deposite New Rules: बचत खात्यात या पेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास IT ठोठावते तुमचा दरवाजा..

Asia Cup 2023: ..म्हणून सूर्यकुमार यादव वर्ल्डकपचा भाग नसणार; आशिया कपमधूनही वगळले जाणार..

Fliese disposal tips: घरात माशांनी धुडगूस घातलाय? फक्त करा हा उपाय, माशी पुन्हा शोधूनही सापडणार नाही..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.