Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

0

Sexual health Tips: जोडप्यांच्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, रिस्पेक्ट या गोष्टींबरोबरच शारीरिक संबंध देखील खूप महत्वाचा रोल पार पाडतात. मात्र आपल्याकडे या गोष्टीला एका वेगळ्याच भावनेतून पाहिलं जातं. साहजिकच त्यामुळे महिला देखील या विषयावर उघडपणे बोलत नाहीत. अगदी शारीरिक संबंधाच्या समस्या असतील तरीदेखील‌ महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

खरंतर महिला या विषयांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण अनेकदा पुरुष देखील असतात. जर तुम्ही या विषयावर आपल्या पार्टनरसोबत स्पष्टपणे संवाद साधला, तर महिलांना होत असणाऱ्या शारीरिक संबंधाच्या समस्या दूर होऊ शकतात. अनेक महिलांना संबंधानंतर खूप जळजळ, दुखणे, इत्यादी त्रास होतो. मात्र अनेक महिला ही सामान्य बाब आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ही सामान्य नाही तर गंभीर समस्या असू शकते. सकाळी सेक्स करण्याचे  फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

पहिल्यांदा संबंध ठेवताना जळजळ, दुखणे, इत्यादी त्रास होतो ही सामान्य बाब आहे. मात्र नियमित संबंध ठेवल्याने, हा त्रास कमी होत जातो. आणि अवयवाला याची सवय होते. नियमित संबंध ठेवून देखील संबंधानंतर तसाच त्रास, जळजळ होत राहिला तर ही सामान्य बाब नसून, ही एक गंभीर समस्या आहे.

जर तुम्ही नियमित संबंध ठेवत असाल तरी देखील संबंधानंतर तुमच्या अवयवांमध्ये जळजळ, अवयव दुखणे, पोट दुखणे, अशा समस्या जाणवत असतील तर तुम्हाला शारीरिक संबंध इन्फेक्शनची जंतुसंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्यामध्ये तुमच्या अवयवात गाठी, त्याचबरोबर पडद्याच्या समस्या देखील असू शकतात. असं स्त्री रोग तज्ञ सांगतात.

संबंधानंतर जर तुमच्या पोटामध्ये खोल दुखल्यासारखं वाटत असेल, तर तुमच्या अवयवाला आतून सूज आलेली असण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधा नंतर तुमच्या अवयवात जळजळ होणे, पोट दुखणे असे प्रकार घडतात. अवयवामध्ये आलेल्या कोरडेपणामुळे देखील ही समस्या होते.

स्त्रियांच्या अवयवामध्ये जर कोरडेपणा आलेला असेल, तरी देखील ही समस्या उद्भवते. यावर उपाय सांगताना स्त्री रोग तज्ञ म्हणतात, तुमचे अवयव ओलसर झाल्यानंतरच तुम्ही संबंध करायला सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला फोरप्लेचा दीर्घकाळ वापर करावा लागेल. संबंध ठेवायच्या सुरुवातीला तुम्हाला वॉर्मअप अधिक जास्त करावा लागेल. ज्यामुळे अवयव ओलसर होईल. आणि त्यानंतर तुम्ही समाधानकारकरीत्या संबंध ठेवू शकता.

याशिवाय संबंध ठेवल्यानंतर, अवयव स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही संबंध ठेवू इच्छित असाल, तेव्हा दोघांची सहमती असणे फार आवश्यक आहे. तसेच तुम्ही डॉक्टरांचा देखील सल्ला घेऊ शकता. दोघांनाही आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी संबंधादरम्यान तुम्ही संभाषण करणे देखील आवश्यक आहे.

हे देखील वाचा Cake Making Video: तुम्हालाही केक आवडतो? केक बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही केकला पुन्हा जन्मात हातही लागणार नाही..

Adhik Maas Sawan Somwar 2023: श्रावण अधिक महिन्यातील पहिला सोमवार; शुभ योगामुळे या लोकांवर कृपेचा वर्षाव..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.