Cake Making Video: तुम्हालाही केक आवडतो? केक बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही केकला पुन्हा जन्मात हातही लागणार नाही..

0

Cake Making Video: वाढदिवस, आठवणी, आनंद उत्सव, स्वप्नपूर्ती अशा अनेक उत्सवांचे केक कापून सेलिब्रेशन केलं जातं. साहजिकच त्यामुळे प्रत्येकाची केकशी मैत्री झालेली आहे. कार्यक्रमांमध्येच नाही, तर अनेक जण आवड म्हणून किंवा केक खाण्याची इच्छा झाली तरीदेखील केक खातात. काहींना केक प्रचंड आवडतो. आणि म्हणून अनेकजण केक घरी देखील बनवतात. मात्र केक फॅक्टरीमध्ये तुम्ही कधी केक बनवताना पाहिला आहे का? (Cake making virla video)

सोशल मीडियावर (social video) अनेक व्हिडिओ व्हायरल (video Viral) होत असतात. विविध पदार्थ बनवतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी टोस्ट आणि पाव बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता अशाच प्रकारचा केक बनवताना देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्ही पुन्हा केकला हात देखील लावणार नाही.

सोशल मीडियावर एका फॅक्टरीमध्ये केक बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका गंज आलेल्या बादलीमध्ये एक तरुण अंडी फोडताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, तो ज्या बकेटमध्ये अंडी फोडत आहे, त्या बादलीला गंज चढला आहे. शिवाय तो देखील घामाने भिजला आहे. त्यामुळे त्याचा घाम देखील स्टील बकेटमध्ये पडताना दिसत आहे.

गंजलेल्या स्टील बकेटमधून अंडी तो एका मिश्रण करणाऱ्या मशीनच्या भांड्यामध्ये ओततो. त्यानंतर त्या मशीनच्या भांड्यामध्ये तो केकसाठी लागणारे पीठ टाकतो.आणि मिश्रण करून घेतो. मात्र हे करत असताना आजूबाजूला प्रचंड अस्वच्छ जागा असल्याचे दिसत आहे. शिवाय मशीनच्या अवतीभवती देखील प्रचंड गंज आलेला तुम्ही पाहू शकता.

अंडी आणि पिठाचे मिश्रण ज्या भांड्यामध्ये ठेवलं आहे, ते भांडं देखील प्रचंड खराब असल्याचं तुम्ही पाहू शकता. याशिवाय हे भांड ज्या भट्टीमध्ये ठेवलं जाते, ती भट्टी देखील प्रचंड अस्वच्छ आहे. सगळ्यात कीळसपणा प्रकार म्हणजे भट्टीतून केकचं मिश्रण बाहेर जेव्हा काढलं जातं, तेव्हा ते कापण्यासाठी एका अस्वच्छ टेबलावर ठेवून ते कटिंग केले जाते. हा प्रकार फारच किळसवाणा वाटतो. जो पाहून तुम्हाला देखील केक खाण्याची पुन्हा इच्छा होणार नाही.

हे देखील वाचा Adhik Maas Sawan Somwar 2023: श्रावण अधिक महिन्यातील पहिला सोमवार; शुभ योगामुळे या लोकांवर कृपेचा वर्षाव.. 

Majhi Kanya Bhagyashree Yojana: मुलगी जन्मानंतर महाराष्ट्र सरकार कडून मिळतायत 50 हजार; जाणून घ्या नियम अटी..

Ajit Agarkar: रोहित बरोबर विराटचीही T-20 कारकीर्द संपुष्टात; नवीन अध्यक्ष अजित आगरकरने केले हे स्पष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.