Ajit Agarkar: रोहित बरोबर विराटचीही T-20 कारकीर्द संपुष्टात; नवीन अध्यक्ष अजित आगरकरने केले हे स्पष्ट..

0

Ajit Agarkar: सलग दोन टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाची सुमार कामगिरी राहिली. गेल्या वर्षी पार पडलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये देखील भारतीय संघाचा सेमी फायनलमध्ये इंग्लंड संघाने दारून पराभव केला. आणि म्हणून आगामी 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या संघ बांधणीला आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अनेक नवीन खेळाडूंना टी-ट्वेंटी संघात समावेश करण्यात आला असून, यामुळे काही अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (Virat Kohli, Rohit Sharma will not be part of the T20 squad)

चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या टी-ट्वेंटी संघाच्या निवडीत रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) या दोन्ही दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले. स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्माला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. चेतन शर्माच्या जागी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून, अजित आगरकर (ajit agarkar) यांची निवड करण्यात आली आहे. अजित आगरकर यांनी नुकतीच वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या पाच t20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. (IND vs WI)

भारताचे दोन स्टार खेळाडू टी-ट्वेंटी संघाचा भाग असणार की नाही, याविषयी अद्याप स्पष्टता देण्यात आली नाही. मात्र गेल्या काही टी 20 मालिकेचा दोन्ही खेळाडू भाग राहिले नाहीत. साहजिकच यामुळे भारताच्या टी-ट्वेंटी संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश करण्यात येणार आहे की नाही? याविषयी क्रिकेट चाहत्यांच्या मनात संभ्रमता होती. मात्र आता निवड समितीचे नवीन अध्यक्ष अजित आगरकर यांनी ही संभ्रमता दूर केली आहे.

सध्या भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर असून भारतीय संघाला या दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय, आणि पाच t20 सामने खेळायचे आहेत. यामधील पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आहे. भारत आणि वेस्टइंडीज संघामध्ये टी-ट्वेंटी मालिका 3 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तीन ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या t20 मालिकेसाठी भारतीय संघाची नवीन अध्यक्षांनी घोषणा केली आहे. ज्यामुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

आगामी t20 विश्वचषकासाठी भारतीय संघ बांधणी सुरू असून, या संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश नसणार असल्याचं जवळपास स्पष्ट झाले आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या टी-ट्वेण्टी संघामध्ये विराट आणि रोहित शर्माला स्थान देण्यात आले नव्हते. नवीन निवड समिती अध्यक्ष टी-ट्वेंटी संघात रोहित आणि विराटला स्थान देणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र नवीन अध्यक्ष अजित आगरकर यांनी देखील टी ट्वेण्टी संघात रोहित आणि विराटला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रोहित मुळे विराटचा बळी

2022 मध्ये पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक खेळी करून अशक्य वाटणारा विजय विराट कोहलीने एकहाती मिळवून दिला. मात्र तरी देखील त्याला भारतीय टी ट्वेंटी संघात स्थान देण्यात येत नसल्यामुळे, अनेकांनी टीका देखील केली आहे. रोहित शर्माचा t20 मध्ये फॉर्म नाही. मात्र त्याला एकट्याला टी- ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची हिंमत निवड समितीमध्ये नसल्याने त्याच्याबरोबर विराटचा देखील बळी दिला जात असल्याची टीका होऊ लागली आहे.

हे देखील वाचा Viral video: ..म्हनून लेकरासाठी आईने दिला धावत्या ट्रक खाली जीव; पाहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ..

Realme C53: दहा हजारांत 108MP कॅमेरा फोन; फ्लिपकार्टवर दमदार ऑफर..

Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचा कहर; जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती..

Kirit Somaiya: सोमय्या सोबत ती व्यक्ती कोण? सोमय्या त्या व्हिडिओत नक्की काय करत होता? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.