Viral video: ..म्हनून लेकरासाठी आईने दिला धावत्या ट्रक खाली जीव; पाहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ..

0

Viral video: प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या लेकराने देखील आयुष्यात यशस्वी व्हाव. यासाठी ती दिवस रात्र मेहनत देखील घेते. आपल्या मुलानेही उच्च शिक्षण घ्यावं, आणि नोकरी करावी, हे प्रत्येक आईचे स्वप्न असते. त्यासाठी ती आपल्या हाडाची काडे करते. यासंदर्भातली अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या आसपास सहज पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर यासंदर्भातलाच असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या हृदय पिळवटून जाईल. (Social media Viral video)

अलीकडच्या काळात उच्च शिक्षण घेणे, हे आता सोपे राहिले नाही. विद्यापीठामध्ये घेण्यासाठी भरमसाठ फी आकारली जाते. याच संदर्भातली ही घटना आहे. आपल्या मुलाच्या शिक्षणाची फी भरू न शकल्याने चक्क आईने आपला जीव दिला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

मुलाच्या शिक्षणासाठी 45 हजार रुपये भरायचे होते. मात्र एवढे पैसे आपल्याकडे नसल्याने ती हतबल झाली. आपल्या लेकराचं भविष्य अंधारात जात असल्याचं आपल्या डोळ्यांना पाहवणार नाही, हा विचार करून तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आपल्या पश्चात मुलाच्या शिक्षणाची फी भरली जाईल, या उद्देशाने तिने आपला जीव दिली.

आपल्या लेकरासाठी जीव देणारी ही महिला सफाई कामगार होती. आई आपल्या लेकरासाठी जीवही देऊ शकते, याचे जिवंत उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत रस्त्याच्या कडेने एक महिला मोठ्या पावलाने जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या देहबोली वरून आपण या घटनेचा अंदाज लावू शकतो.

रस्त्याच्या कडेने मोठ्या पावलाने जात असतानाच समोरून अचानक भरधाव वेगाने ट्रक येतो. आपल्या लेकरासाठी जीव द्यायचा हे महिलेने आपल्या मनाशी पक्क ठरवलं होतं. जसा भरधाव वेगाने ट्रक जवळ येतो, तशी ही महिला ट्रॅक खाली उडी घेते. ट्रकचा वेग जास्त असल्यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू होतो. हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ @lovely92698976 या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Kirit Somaiya: सोमय्या सोबत ती व्यक्ती कोण? सोमय्या त्या व्हिडिओत नक्की काय करत होता? वाचा सविस्तर..

husband wife relation: या तीन गोष्टी बायको आपल्या नवऱ्यापासून नेहमी लपवतात..

Seema Haider: प्रेम नव्हे सापळा! सीमा हैदरच्या ATS चौकशीतून धक्कादायक माहिती समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.