husband wife relation: या तीन गोष्टी बायको आपल्या नवऱ्यापासून नेहमी लपवतात..

0

husband wife relation: कोणत्याही नात्यामध्ये विश्वास (trust) खूप महत्वाचा असतो. खासकरून पती-पत्नीच्या (husband wife) नात्यामध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विश्वासाबरोबर संवाद देखील आवश्यक आहे. पती-पत्नी दोघांच्याही नात्यामध्ये जितका जास्त संवाद, नातं तितकं जास्त मजबूत मानले जाते. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये निखळ संवाद असणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट दोघांनीही एकमेकांविषयी लपवून ठेवू नये, असं अनेकदा सांगितलं जातं. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या पत्नी पतीला कधीच सांगत नाही.

..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद हवा असेल, तर आपली पत्नी समाधानी आणि आनंदी ठेवणं फार आवश्यक असतं. आपल्या पत्नीच्या आवडी-निवडी, भावना पतीने वेळीच ओळखून त्या दृष्टीने पावले टाकणे एक चांगल्या पार्टनरचे लक्षण असतं. पत्नी अनेकदा काही गोष्टी आपल्या पतीला स्पष्टपणे बोलत नाही. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी पती-पत्नीच्या नाते संबंधाविषयी आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथामध्ये स्पष्टता केली आहे. वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, पत्नीला काही गोष्टी मान्य नसताना देखील पत्नी आपल्या नवऱ्याच्या निर्णयाला उघडपणे विरोध करत नाही. कोणताही निर्णय घेताना पती-पत्नी दोघांची देखील मान्यता फार आवश्यक असते. तरच निर्णय पूर्वत्वास जाऊ शकतो. अन्यथा घेतलेला निर्णय चुकीचा देखील ठरण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून आपण घेतलेल्या निर्णयात पत्नी खुश आहे का? याचा विचार करून पुढे जाणे आवश्यक असते.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये संबंधाला खूप महत्त्व आहे. नात्यांमध्ये प्रेम, आनंद, सुख, समाधान, या गोष्टी बऱ्याच प्रमाणात संबंधावर देखील अवलंबून असतात. मात्र पत्नी स्वतःहून याविषयी कधीही आपल्या पतीला स्पष्टपणे बोलत नाही. संबंध ठेवण्याची इच्छा अधिक असली तरीही पत्नी कधीच आपल्या पतीला स्पष्ट सांगत नाही. आणि म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, चांगला संसार करायचा असेल तर पत्नीच्या भावना लक्षात घेणे आवश्यक असते.

आचार्य चाणक्य सांगतात, पतीपेक्षा पत्नीला कुटुंबाची अधिक काळजी असते. पत्नी नेहमी भविष्याची काळजी करत आपला संसार थाटत असते. भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी देखील पत्नी आपल्या पद्धतीने नेहमी प्रयत्न करत राहते. संकट आले तर त्याचा सामना करण्यासाठी म्हणून पत्नी दररोज बचत करून ठेवत असते. आपण केलेली बचत पत्नी पतीला कधीच सांगत नाही.

हे देखील वाचा Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

husband wife relationship tips: असंतुष्ट पत्नी देते हे इशारे, वेळीच ओळखा अन्यथा..

Chanakya Niti On Success: ..म्हणून या तीन लोकांकडे वाईट काळ फिरकतही नाही..

physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.