Realme C53: दहा हजारांत 108MP कॅमेरा फोन; फ्लिपकार्टवर दमदार ऑफर..

0

Realme C53: कमी किंमतीत दर्जेदार फीचर्स असणारा स्मार्टफोन प्रत्येकाला खरेदी करायचा असतो. मात्र अनेकांना स्मार्टफोन ऑफरमध्ये कुठे विक्री होत आहे, याविषयी वेळेत माहिती मिळत नाही. याबरोबरच कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा याविषयी देखील योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी कमी किंमतीमध्ये दर्जेदार फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोन विषयी माहिती देणार आहोत. वाचा सविस्तर.. (Realme smartphone)

Realme या स्मार्टफोन कंपनीने अनेक दर्जेदार स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. आता नुकताच Realme ने आपला Realme C53 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत केवळ दहा हजार रुपये ठेवली आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार या स्मार्टफोनची किंमत ठेवली आहे. या स्मार्टफोनकडे आकर्षित करणारी एक गोष्ट म्हणजे 108 MP कॅमेरा. हा स्मार्टफोन तुम्हाला 108 MP कॅमेऱ्यासह मिळणार आहे. सोबतच या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरी देण्यात देण्यात आली आहे.

Realme ने आपला C53 हा स्मार्टफोन दोन प्रकारामध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये 4GB + 128GB आणि 6GB + 64GB असे दोन व्हेरियंट असणार आहेत. यामध्ये 9,999 आणि 10,999 अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला दोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये एक चॅम्पियन गोल्डन आणि दुसरा चॅम्पियन ब्लॅक असे कलर असतील. 26 जुलै पासून तुम्ही हा स्मार्टफोन realme.com त्याचबरोबर Flipkart.com या ई कॉमर्स वेबसाईटवर खरेदी करू शकता.

Realme C53 या स्मार्टफोनला कंपनीने 6.74 इंच डिस्प्ले दिला आहे. स्मूथनेससाठी 90Hz तसेच स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.3% दिला आहे. कॅमेरे विषयी अधिक जाणून घ्यायचं झाल्यास, या स्मार्टफोनला तब्बल 108 MP कॅमेरा येतो. जो 30fps त्याचबरोबर 720P/30fps तसेच 480P/30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट देखील करतो.

नवीन स्मार्टफोन खरेदी करताना आपण कॅमेरा त्याचबरोबर बॅटरी देखील दमदार आहे की नाही, हे तपासतो. या दोन्ही गोष्टी तुम्हाला या स्मार्टफोन खरेदीवर मिळणार आहेत. कॅमेऱ्या बरोबरच या स्मार्टफोनची बॅटरी देखील दमदार देण्यात आली आहे. तब्बल 5000mAh ची बॅटरी या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला मिळते. सोबतच 18W चार्जर ही बॅटरी सपोर्ट देखील करते.

हे देखील वाचा Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचा कहर; जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती..

Viral video: ..म्हनून लेकरासाठी आईने दिला धावत्या ट्रक खाली जीव; पाहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ..

Kirit Somaiya: सोमय्या सोबत ती व्यक्ती कोण? सोमय्या त्या व्हिडिओत नक्की काय करत होता? वाचा सविस्तर..

husband wife relation: या तीन गोष्टी बायको आपल्या नवऱ्यापासून नेहमी लपवतात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.