Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचा कहर; जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती..
Maharashtra Rain Updates: यावर्षी महाराष्ट्रात मान्सून खूप उशिरा दाखल झाला. काही दिवस विश्रांती दिल्यानंतर आता काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार आणि अतीमुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 70 टक्के शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केलेले नाही. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळही आली आहे. मात्र आता पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जाणून घेऊया आज महाराष्ट्रातील पावसाची स्थिती काय आहे.
कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रामनाथ किल्ल्यावर शंभरहून अधिक पर्यटक अडकले होते. मात्र स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रांगणा गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावर पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटक अडकले होते.
साताऱ्यामध्ये देखील काही भाग वगळता मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस सुरू आहे. वाईमध्ये सध्या जोरदार पाऊस असून, वाई तालुक्यातील नदी तसेच नाल्यांना पूर आल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक रस्ते देखील पाण्याखाली आले आहेत. साताऱ्यामध्ये येणारे चार दिवस अशीच परिस्थिती असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुण्यामध्ये देखील पाऊसाने हजेरी लावली आहे. आयएमडीने पुणे जिल्ह्यातील पावसाविषयी अंदाज व्यक्त केला आहे. हा संपूर्ण आठवडा मुसळधार आणि अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अहमदनगरमध्ये देखील पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागात अति मुसळधार पाऊस कोसळला आहे. भंडारदरा धरण सध्या 70 टक्के भरले असून, दोन दिवसात शंभर टक्के धरण भरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बुलढाणा मधील मलकापूर तालुक्यातमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागातील वाहतूक कोंडी पावसामुळे विस्कळीत झाली आहे. वाशिम जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा Viral video: ..म्हनून लेकरासाठी आईने दिला धावत्या ट्रक खाली जीव; पाहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ..
husband wife relation: या तीन गोष्टी बायको आपल्या नवऱ्यापासून नेहमी लपवतात..
Kirit Somaiya: सोमय्या सोबत ती व्यक्ती कोण? सोमय्या त्या व्हिडिओत नक्की काय करत होता? वाचा सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम