Majhi Kanya Bhagyashree Yojana: मुलगी जन्मानंतर महाराष्ट्र सरकार कडून मिळतायत 50 हजार; जाणून घ्या नियम अटी..

0

Majhi Kanya Bhagyashree Yojana: राज्यामध्ये मुलींची संख्या वाढविण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra government) अनेक योजना राबवत आहे. राज्यामध्ये मुलींची संख्या वाढविण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर राज्य सरकार तिच्या पालकाला आर्थिक मदत करत करत आहे. कुटुंबात जर मुलीचा जन्म झाला तर हजार रुपयाची आर्थिक मदत केली जात आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री’ असं या योजनेचे नाव असून, 2016 पासून महाराष्ट्रात ही योजना अस्तित्वात आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर. (MKBY)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून काही अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला केवळ दोनच मुलींना जन्म द्यावा लागणार आहे एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबरोबर जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे जाणून घेऊया योजनेविषयी अधिक सविस्तरपणे..

2016 पासून महाराष्ट्र सरकारने ही योजना अस्तित्वात आणली. मग माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत मध्ये स्वतःची नसबंदी करावी लागणार आहे. तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जर तुम्ही मुलीच्या जन्मानंतर, एका वर्षाच्या आत मध्ये नसबंदी केली, तर राज्य सरकार त्या मुलीच्या खात्यामध्ये 50 हजार रुपयाची रक्कम जमा करते. जर तुम्हाला दोन मुली जन्मल्या असतील तर तुम्हाला दोन्ही मुलींच्या खात्यामध्ये 25-25 हजार रुपयाची राशी अशा स्वरूपात या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुलीच्या खात्यावर पन्नास हजार रुपये शासन जमा करते ही राशी तुम्हाला मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच काढता येणार आहे. यामध्ये देखील शासनाने काही अटी घालून दिल्या आहेत. यामध्ये मुलीचे शिक्षण हे दहावीपर्यंत पूर्ण असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला हि राशी मिळणार आहे.

एक लाखाचा विमा

माझी कन्या भाग्यश्री या योजनेनुसार तुम्हाला 50000 रुपयाच्या राशी बरोबर एक लाखाचा विमा देखील देण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून मुलीची आई आणि मुलीच्या नावाने संयुक्त खाते बँकेत काढले जाते. ज्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपयाची ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि एक लाख रुपयांचा विमा असा लाभ मिळतो.

आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला देखील माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याबरोबरच आई आणि मुलीचे बँक पासबुक, मोबाईल नंबर, रहिवाशी दाखला, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, उत्पन्नाचा दाखला, इत्यादी कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे.

असा घ्या लाभ

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://maharashtra.gov.in/1125/Home सर्च करा. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवरून तुम्ही माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता.

डाउनलोड केलेला फॉर्म तुम्ही जवळच्या महिला व बाल कल्याण विभागामध्ये सबमिट करायचा आहे. फॉर्मवर आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून तुम्ही हा फॉर्म संबंधित कार्यालय जमा करा. तुम्ही भरलेल्या फॉर्मची पडताळणी करून महिला व बालकल्याण विभाग योग्य असल्यास तुमचा प्रस्ताव मंजूर करेल. आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येईल.

हे देखील वाचा Ajit Agarkar: रोहित बरोबर विराटचीही T-20 कारकीर्द संपुष्टात; नवीन अध्यक्ष अजित आगरकरने केले हे स्पष्ट..

Viral video: ..म्हनून लेकरासाठी आईने दिला धावत्या ट्रक खाली जीव; पाहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ..

Realme C53: दहा हजारांत 108MP कॅमेरा फोन; फ्लिपकार्टवर दमदार ऑफर..

Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचा कहर; जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती..

Kirit Somaiya: सोमय्या सोबत ती व्यक्ती कोण? सोमय्या त्या व्हिडिओत नक्की काय करत होता? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.