Adhik Maas Sawan Somwar 2023: श्रावण अधिक महिन्यातील पहिला सोमवार; शुभ योगामुळे या लोकांवर कृपेचा वर्षाव..

0

Adhik Maas Sawan Somwar 2023: हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होतात. असा अनेकांचा समज आहे. आणि म्हणून आजपासून श्रावण अधिक महिन्यामधील पहिला सोमवार आहे. आजचा दिवस हा प्रचंड शुभ दिवस आहे. जाणून घ्या सविस्तर.

आज काही राशींवर भगवान शंकराची कृपा राहणार असून, आजच्या दिवशी प्रचंड शुभ योग जुळून आला आहे. रुद्राभिषेक करण्यासाठी आजचा दिवस प्रचंड शुभ असणार आहे. आज रवियोग, शिवयोग हे शिवदास नदीवर असणार आहेत. त्यामुळे भगवान शंकराची काही राशींवर आज पासून पुढचे काही दिवस प्रचंड कृपा राहणार आहे. (Adhik Maas Sawan Somwar 2023)

अधिक श्रावण मासामधील आजचा पहिला सोमवार असून मेष राशीच्या लोकांकरिता आजचा दिवस हा उत्तम दिवस आहे. मेष राशीच्या लोकांविषयी आज अनेक आनंदाच्या गोष्टी घडणार आहेत. मेष राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये आज गोडवा येणार असून, वैवाहिक जीवनामध्ये देखील अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आरोग्याच्या समस्या देखील आजपासून दूर होणार आहेत.

वृषभ राशीच्या लोकांवर देखील आज शंकराची कृपा राहणार असून, आज या राशीच्या लोकांना देखील मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजपासून सुवर्णकाळ सुरू होणार असून, व्यवसायात देखील मोठा लाभ होणार आहे. आपल्या आवडत्या लोकांसोबत मोठी खरेदी करणारा योग देखील या राशीच्या लोकांना प्राप्त होणार आहे.

आजपासून कर्क राशीच्या लोकांंच्या आयुष्यात देखील भरभराटी यायला सुरुवात होणार आहे. आजपासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात गोडवा आणि आनंद येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्यवसाय क्षेत्रात देखील कर्क राशीच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत. नवीन लग्न झालेल्या लोकांच्या अडचणी देखील आजपासून दूर होणार आहेत. समाजात मानसन्मान मिळणारी कामे तुमच्या हातून घडणार आहे.

कन्या राशीसाठी देखील आजचा दिवस हा प्रचंड भाग्याचा दिवस असणार आहे. या राशीच्या लोकांनी आर्थिक परिस्थिती आजपासून सुधारणार आहे. उत्पन्नामध्ये देखील भरभराटी येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील तुमचे कौतुक होणार आहे.

धनु राशीच्या लोकांकरीता आजचा दिवस हा सुवर्ण दिवस असणार आहे. धनू राशीच्या लोकांना आज अचानक मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. व्यापार क्षेत्र सांभाळणाऱ्या लोकांकरिता देखील आज सुवर्णदिवस असून, या लोकांवर देखील शंकराची कृपा असणार आहे. नातेसंबंधामध्ये देखील सुधारणा होणार असून, कौटुंबिक समाधान मिळणार आहे.

हे देखील वाचा Majhi Kanya Bhagyashree Yojana: मुलगी जन्मानंतर महाराष्ट्र सरकार कडून मिळतायत 50 हजार; जाणून घ्या नियम अटी..

Ajit Agarkar: रोहित बरोबर विराटचीही T-20 कारकीर्द संपुष्टात; नवीन अध्यक्ष अजित आगरकरने केले हे स्पष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.