Asia Cup 2023: ..म्हणून सूर्यकुमार यादव वर्ल्डकपचा भाग नसणार; आशिया कपमधूनही वगळले जाणार..

0

Asia Cup 2023: गेल्या वर्षभरात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी20 प्रकारात जबरदस्त कामगिरी करत अनेकांना आपला चाहता बनवलं आहे. सूर्यकुमार यादव हे नाव फक्त भारतातच नाही, तर जगभरात गेल्या वर्षभरात चर्चेत राहील. ट्वेंटी क्रिकेटमध्ये (T20 cricket) कशी फलंदाजी करायची, हे क्रिकेट जगताला सूर्यकुमार यादवने दाखवून दिलं. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच चेंडूवर फटका मारताना किंचितही संकोच न ठेवणाऱ्या सूर्यकुमार यादवचे आता मात्र एकदिवसीय क्रिकेटमधील स्थान धोक्यात आले आहे. (Suryakumar Yadav will not be a part of the World Cup)

भारतीय संघ (Indian team) सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. (India tour of West Indies) अनेक प्रमुख फलंदाजांना या दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग होता आले नाही. दुखापतीमुळे केएल राहुल (kl Rahul) श्रेयश अय्यर (Shreyas Iyer) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऋषभ पंत (rishabh pant) हे प्रमुख खेळाडू सध्या भारतीय संघाचा भाग नाहीत. मात्र बीसीसीआयने (BCCI) आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी (asia cup 2023) ऋषभ पंत वगळता या प्रमुख खेळाडूंचा विचार केला जात आहे.

केएल राहुल, श्रेयश अय्यर, जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंच्या सहभागामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ अद्याप निवडलेला नाही. या तीन प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीचे अपडेट समोर आल्यानंतर, आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. साहजिकच यामुळे भारतीय संघात अंतिम 11 मध्ये सूर्यकुमार यादवला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने दमदार खेळ केला आहे. साहजिकच त्यामुळे भारतीय संघामध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून अय्यरची अंतिम 11 मध्ये अधिकृतरित्या निवड होणार आहे. आशिया चषक स्पर्धेमध्ये जर श्रेयश तंदुरुस्त झाला तर सूर्यकुमार यादवला आशिया चषक स्पर्धा आणि आगामी विश्वचषकामध्ये भारताच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळणार नाही अशी माहिती आहे.

दुसरीकडे कार अपघातात दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंत देखील आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याची जागी संजू सॅमसनला (sanju Samson) भारतीय संघात विकेटकिपर म्हणून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय दुसरा विकेटकीपर म्हणून केल राहुलची देखील निवड होणार असल्याची दाट शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे, त्याने पाचव्या स्थानावर ठीकठाक कामगिरी केली आहे.

आशिया चषक स्पर्धेला दोन सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून, या स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघामध्येच खेळवला जाणार आहे. अद्याप या स्पर्धेसाठी भारताने संघ निवडलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिया चषक स्पर्धेसाठी केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह यांची निवड केली जाणार आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या सहभागामुळे सूर्यकुमार यादवला डच्चू मिळणार असल्यासची माहिती आहे.

असणार आशिया चषक आणि विश्वचषकासाठी भारतीय टीम..

रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, हार्दिक पंड्या, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, केएल राहुल (विकेटकीपर) रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल

हे देखील वाचा Fliese disposal tips: घरात माशांनी धुडगूस घातलाय? फक्त करा हा उपाय, माशी पुन्हा शोधूनही सापडणार नाही..

IND vs WI 1st Odi: अशी आहे पहिल्या वनडेसाठी भारताची अंतिम अकरा; जाणून घ्या सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण..

Couple Water Park video: पाण्यातच गडी आला खळीला, अन् वॉटर पार्कलाच केलं Oyo; पाहा तो व्हिडिओ..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

Cake Making Video: तुम्हालाही केक आवडतो? केक बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही केकला पुन्हा जन्मात हातही लागणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.